कॅन्सरशी लढा संपला, ‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेते शफीक अन्सारी कालवश

शफीक अन्सारी यांनी कारकीर्दीत धर्मेंद्र, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, माधुरी दीक्षित, दिलीप कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यासारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. (Crime Patrol Actor Shafique Ansari Dies of Cancer)

कॅन्सरशी लढा संपला, क्राईम पेट्रोल फेम अभिनेते शफीक अन्सारी कालवश
| Updated on: May 12, 2020 | 11:45 AM

मुंबई : ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेत पोलिसांची भूमिका साकारणारे अभिनेते आणि पटकथा लेखक शफीक अन्सारी (Shafique Ansari) यांचे निधन झाले. कर्करोगाशी दीर्घ काळापासून सुरु असलेला त्यांचा लढा अखेर संपला. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवार 10 मे रोजी सकाळी शफीक अन्सारी यांनी जगाचा निरोप घेतला. (Crime Patrol Actor Shafique Ansari Dies of Cancer)

शफीक अन्सारी यांनी 1974 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत. शफीक अन्सारी यांनी बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे, परंतु ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेतील पोलिसाच्या भूमिकेसाठी ते परिचित होते.

अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या ‘बागबान’ या चित्रपटासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक आणि लेखक म्हणून काम केले. अनेक चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये देखील सहायक अभिनेता म्हणून काम केले आहे.

हेही वाचा : कर्करोगाशी झुंज संपली; पीके, रॉक ऑन फेम अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे निधन

शफीक अन्सारी यांनी कारकीर्दीत धर्मेंद्र, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, माधुरी दीक्षित, दिलीप कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यासारख्या कलाकारांसोबत काम केले आहे.

शफीक अन्सारी यांना पोटाच्या कर्करोगाने ग्रासले होते. गेल्या काही वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या फुफ्फुसात देखील संसर्ग झाला होता. (Crime Patrol Actor Shafique Ansari Dies of Cancer)

शफीक अन्सारी हे ‘सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’चे सदस्य होते. त्यांच्या निधनाचं वृत्त देत ‘सिंटा’ने ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, ‘पीके’, ‘रॉक ऑन’ यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये छोटेखानी भूमिका साकारलेला अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचेही रविवारीच प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. दोन वर्षांपासून मेंदूच्या कर्करोगाशी सुरु असलेली त्याची झुंज संपली. अमेरिकेत उपचारादरम्यान साईप्रसादची प्राणज्योत मालवली. (Crime Patrol Actor Shafique Ansari Dies of Cancer)