AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्करोगाशी झुंज संपली; पीके, रॉक ऑन फेम अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे निधन

एमटीव्हीवरील 'स्प्लिट्सविला 4' (Splitsvilla Season 4) या कार्यक्रमामुळे साईप्रसादला प्रसिद्धी मिळाली होती. (Actor Sai Gundewar dies of Brain Cancer)

कर्करोगाशी झुंज संपली; पीके, रॉक ऑन फेम अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे निधन
| Updated on: May 10, 2020 | 7:13 PM
Share

न्यूयॉर्क : ‘पीके’, ‘रॉक ऑन’ यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये छोटेखानी भूमिका साकारलेला अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून मेंदूच्या कर्करोगाशी सुरु असलेली त्याची झुंज अखेर संपली. अमेरिकेत उपचारादरम्यान साईप्रसादची प्राणज्योत मालवली. (Actor Sai Gundewar dies of Brain Cancer)

साईप्रसाद गुंडेवार मूळ नागपूरचा होता. ‘ग्लायोब्लास्टोमा’ म्हणजेच मेंदूच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर फेब्रुवारी 2019 मध्ये तो ऑपरेशनसाठी अमेरिकेतील लॉस अँजेलसला गेला होता. मात्र भारतीय प्रमाण वेळेनुसार आज (रविवार 10 मे) सकाळी 7.30 वाजता साईप्रसादने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्याने त्याचे मित्रमंडळीही हळहळले आहेत.

एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सविला 4’ (Splitsvilla Season 4) या कार्यक्रमामुळे साईप्रसादला प्रसिद्धी मिळाली. या शोमधील अनोख्या लूकमुळे त्याला अनेक कार्यक्रमांच्या ऑफर मिळाल्या होत्या. साईप्रसाद गुंडेवारने अनेक इंग्रजी मालिका, बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. साई गुंडेवार या नावाने तो ओळखला जात होता.

‘रॉक ऑन’, ‘युवराज’, ‘पप्पू कान्ट डान्स साला’, ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’, ‘डेव्हिड’, ‘आय मी और मैं’, ‘पीके’, ‘बाजार’ अशा हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडपट आणि लघुपटांमध्ये त्याने भूमिका केल्या. डॉ. मीना नेरुरकर यांच्या ‘ए डॉट कॉम मॉम’ या एकमेव मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली आहे.

एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सविला 4’ (Splitsvilla Season 4), स्टार प्लस वाहिनीवरील ‘सर्वायव्हर’ (Survivor), अमेरिकेतील लोकप्रिय S.W.A.T., Cagney and Lacey, The Orville, The Mars Conspiracies, द कार्ड (The Card) या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

साईप्रसादने 2015 मध्ये फॅशन डिझायनर सपना अमीनशी लग्न केले होते. त्याच्या पश्चात पत्नी सपना, आई राजश्री, वडील राजीव असा परिवार आहे.  अवघ्या काही दिवसापूर्वी बॉलिवूडने इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यासारखे दोन मोहरे कर्करोगामुळे गमावले आहेत. त्यातच आणखी एक कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Actor Sai Gundewar dies of Brain Cancer)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.