
बीड: मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. कापूस नासला आहे तर सोयाबीनवर बुरशी आलीय.

लॉकडाऊनमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत असताना आता शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला गेलाय.

सोयाबीन, कापूस, पीकं हातातून गेलीत तर ऊसाच्या शेतीत पाणी साचल्याने उसाला मुळ्या फुटतायत. शेतात असलेल्या सर्वच पिकांना या पावसाचा फटका बसलाय.

कापसाच्या बोंडांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.

रात्रभर पडत असलेल्या पावसाने शहापूर तालुक्यातील अनेक भागातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

सांगली जिल्ह्यातील 25 पूल पाण्याखाली गेले आहेत, तर 18 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. शेकडो हेक्टर शेतीला फटका बसला आहे.

सांगली मिरज पूर्व भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले.

लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अतिवृष्टीने पिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे. सोयाबीन आणि ऊस शेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.

साताऱ्यातील वेण्णा नदीवरिल कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.