दूध उत्पादकांचा 1 ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार, शेतकरी संघर्ष समितीची घोषणा

| Updated on: Jul 31, 2020 | 10:26 AM

"दूध उत्पादक 1 ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार करणार", अशी घोषणा किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे (Dairy Farmers protest).

दूध उत्पादकांचा 1 ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार, शेतकरी संघर्ष समितीची घोषणा
Follow us on

पुणे : “दूध उत्पादक 1 ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार करणार”, अशी घोषणा किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे (Dairy Farmers protest). चावडीवर दुधाचा अभिषेक घालत राज्यभर आंदोलन तीव्र करणार. प्रति लिटीर 10 रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, अशी मागणी किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे (Dairy Farmers protest).

“दूध उत्पादकांचे आंदोलन तीव्र करण्याची हाक किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिली आहे. दुधाला प्रति लिटर किमान 30 रुपये भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर 10 रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा”, अशी मागणी या शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.

“केंद्रातील मोदी सरकारने 26 जून रोजी नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशातून 10 लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा. हा निर्णय शेतकऱ्यांचा घात करणारा आहे”, असं या समितीने म्हटले.

“जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध आणि दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा आणि देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान 50 रुपये अनुदान द्या”, असंही या समितीने म्हटले.

किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि समविचारी संघटनांच्या वतीने 20 जुलैपासून राज्यात आंदोलन सुरू आहे. 1 ऑगस्ट रोजी राज्यभर गावोगावी चावडीवर दुधाचा अभिषेक घालत निदर्शने करत हे आंदोलन तीव्र केले जाणार आहे.

दरम्यान, “महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. आम्ही चांगली योजना आणू, आंदोलनामुळे ही बैठक होते असं नाही. ही बैठक आधीच नियोजित होती. मी स्वत: ही बैठक 16 जुलैला बोलवली होती. ही बैठक तोडगा काढण्यासाठी बोलवण्यात आली नव्हती. तर या बैठकीत संघटना आणि नेत्यांनी अनुदानासह दूध उत्पादनाच्या अडचणी मांडल्या,” असे पशु आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितले होते. यावेळी बैठकीत माजी कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह इतर काही संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित बातम्या : 

Raju Shetti | दूध आंदोलन चिघळणार, राजू शेट्टींचा सरकारला 5 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम

Milk Agitation | महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू शेतकरी, दूध उत्पादकांना मदत करण्याची आमची भूमिका : मंत्री सुनील केदार