कोकण रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

मेहबुब जमादार टीव्ही 9 मराठी, रायगड :  कोकण रेल्वेच्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू रेल्वे गाडीची तरुणीला धडक बसल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, हा अपघात आहे की, आत्महत्या याबाबत संभ्रम कायम असून पोलीस तपास करत आहेत. हेमांगी चंद्रकांत मांगडे (29) असं या मयत तरुणीचे […]

कोकण रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मेहबुब जमादार टीव्ही 9 मराठी, रायगड :  कोकण रेल्वेच्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू रेल्वे गाडीची तरुणीला धडक बसल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, हा अपघात आहे की, आत्महत्या याबाबत संभ्रम कायम असून पोलीस तपास करत आहेत.

हेमांगी चंद्रकांत मांगडे (29) असं या मयत तरुणीचे नाव आहे. कोकण रेल्वेच्या वीर स्थानकावर झालेल्या अपघात हेमांगीचा जागीच मृत्यू झाला. हेमांगी मांगडे ही तळोशी येथील रहिवासी होती.

रविवार(18 नोव्हेंबर) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीकडे जाणाऱ्या मालवाहू गाडीची धडक या तरुणीला लागल्याने हा अपघात घडला. हेमांगी जवळल असलेल्या ओळखपत्रावरून तिची ओळख पटली. त्यानंतर तिचा मृतदेह महाडच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला.

तसेच, पुढील अधिक तपास महाड तालुका पोलीस करत आहे.