कृत्रिम पाऊस पाडणार, दिल्लीतील प्रदूषण हटवणार!

कृत्रिम पाऊस पाडणार, दिल्लीतील प्रदूषण हटवणार!
देशातील टॉप 10 प्रदूषित शहरांमध्ये यूपीतील आठ शहरांचा समावेश

प्रशांत लीला रामदास, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली: दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नवा उपाय करण्यात येणार आहे. वायू प्रदूषणावर उपाय म्हणून कृत्रिम पाऊस पाडण्याची कल्पना पुढे आली आहे. यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि कानपूरमधील भारतीय प्रौद्योगिक संस्थेच्या संशोधकांच्या मदतीने कृत्रिम पाऊस पाडण्याची योजना आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी भारतीय हवामान खाते आणि भारतीय अवकाश संशोधक संघटना( इस्रो ) ची मदत घेण्यात येणार आहे.  पाऊस तयार करा, हवा स्वच्छ करा, या सूत्रानुसार दिल्लीच्या वातावरणातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याची योजना आहे.

कोण पाडणार पाऊस ?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ

कानपूरमधील भारतीय प्रौद्योगिक संस्थानचे संशोधक

भारतीय हवामान खाते

भारतीय अवकाश संशोधक संघटना( इस्रो)

हिवाळ्यातील हवामान वायू प्रदूषणासाठी सर्वात वाईट असते. दिल्लीच्या प्रदूषण पातळी निर्देशांकात मोठी घट झाली आहे. प्रदूषणाची सूचकांक 700 पीएम पार झाला आहे. ही पातळी धोकादायक पातळीपेक्षा खूप जास्त आहे.

प्रदूषणाने धोकादायक पातळी पार केल्यामुळे दिल्लीतील लोकांचे सार्वजनिक जीवन धोकादायक होत आहे. याचमुळे वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली सरकारने अभूतपूर्व अभ्यास सुरु केला आहे. दिल्लीत, वायू प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम पावसाची योजना आहे.

इंडियन इन्स्टिट्यूफ ऑफ टेक्नॉलॉजी (आयएमडी) आणि भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) मधील विमानातील हवामान डेटाद्वारे मदत केल्या जाणाऱ्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (सीपीसीबी) आणि भारतीय तंत्रज्ञान (आयआयटी) कानपूरचे संशोधक क्लाऊड बीडिंगची योजना आखत आहेत. कृत्रिम पाऊस राष्ट्रीय राजधानीच्या वायू गुणवत्ता सुधारण्यास मदत करेल, असे संशोधकांना वाटत आहे.

तज्ज्ञांच्या मते, हिवाळयात ढगांमध्ये रसायनाची पेरणी करायची आहे . आगामी 10 नोव्हेंबर नंतर इस्रोच्या तज्ज्ञांनी प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम  पावसाची शिफारस केली आहे.

आम्ही कृत्रिम पावसाची निर्मिती करण्यासाठी तयार आहोत, परंतु वातावरण ढग आणि वायू तयार करण्याची प्रक्रिया अनुकूल होण्यासाठी प्रतीक्षा करणे गरजेचे आहे, असे आयआयटी कानपूर येथील संशोधकांनी  म्हटले आहे.

आयएमडी हवामानाच्या परिस्थितीकडे लक्षपूर्वक नजर ठेवून  आहे. सध्यातरी 10 नोव्हेंबरपर्यंतची परिस्थिती कृत्रिम पावसासाठी अनुकूल नाही,असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.

दिल्लीत कृत्रिम पाऊस किती वेळा असेल? येत्या दिवसात पहिल्या प्रयत्नांच्या परिणामावर आणि प्रदूषणाच्या तीव्रतेवर अवलंबून असेल, असंही  संशोधक सांगत आहे.

कृत्रिम पाऊस पडण्याचा प्रकल्प सीपीसीबीद्वारे कार्यान्वित करण्यात आला आहे.  त्याला केंद्र सरकारकडून निधी दिला जाईल. आयआयटी कानपूर पाऊस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले केमिकलचे  मिश्रण देणार आहे, तर इस्रो विमान आणि क्रू द्वारे ढगांमध्ये रोपण करण्याचे काम करणार आहे.

बऱ्याच वर्षांपासून चीन पाऊस तयार करण्यासाठी क्लाउड बीडिंगचा वापर करीत आहे. अमेरिका, इस्रायल, दक्षिण आफ्रिका आणि जर्मनीनेदेखील पावसासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. भारतात आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येही कृत्रिम पावसाचा प्रयोग यापूर्वी झाला आहे. त्यानंतर आता असाच प्रयोग दिल्लीत होणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI