Dengue Outcry in India:डेंग्यूच्या साथीचा उत्तर भारतात हाहाकार, कोणते राज्य प्रभावित?

| Updated on: Oct 26, 2021 | 1:09 PM

गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्ली आणि पंजाबमध्ये रुग्णांची झपाट्याने वाढ होतेय. दिल्लीत एकूण डेंग्यूच्या रुग्णांची आकडा 1,006 झालाय आणि पंजाबमध्ये 21 ऑक्टोबर पर्यंत 11,129 रुग्ण आढळली. हे लक्षात घेत इतर राज्यही सतर्क झोले आहेत. 

Dengue Outcry in India:डेंग्यूच्या साथीचा उत्तर भारतात हाहाकार, कोणते राज्य प्रभावित?
डेंग्यूचे रुग्ण वाढले.
Follow us on

नवी दिल्लीः डेंग्यूच्या साथीने उत्तर भारतात उद्रेक केला आहे. या महिन्यात उत्तर भारतात डेंग्यूचा प्रसार झपाट्याने झालाय. सप्टेंबरच्या महिन्यात उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाध्ये डेंग्यूच्या साथीला सुरूवात झाली होती. गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्ली आणि पंजाबमध्ये रुग्णांची झपाट्याने वाढ होतेय. दिल्लीत एकूण डेंग्यूच्या रुग्णांची आकडा 1,006 झालाय आणि पंजाबमध्ये 21 ऑक्टोबर पर्यंत 11,129 रुग्ण आढळली. हे लक्षात घेत इतर राज्यही सतर्क झोले आहेत. (dengue outburst in north india delhi punjab up affected)

डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा

दिल्लीत गेल्या आठवड्यापासून डेंग्यूचे 283 रुग्णांची नोंद झाली आणि शनिवारी 240 हून अधिक रुग्ण आढळली. 23 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीत एकूण डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा 1,006 झाला. हा आकडा 2018 पासून सर्वात जास्त आहे. पंजाबमध्ये पण डेंग्यूची रुग्णांची झपाट्याने वाढ होतेय. 21 ऑक्टोबर रोजी डेंग्यूच्या एकूण 11,129 रुग्णसंख्या होती जी पंजाबमध्ये गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक आहे.
12 ऑक्टोबरपासून पंजाबमध्ये रुगणसंख्या 5,889 रुग्णांवरून 21 ऑक्टोबर 11,129 पर्यंत पोहचली. पंजाबमध्ये डेंग्यूची साथ आल्यापासून रुग्णांमध्ये 88.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोहाली, भटिंडा, अमृतसर, होशियारपूर आणि पठाणकोट या पाच जिल्ह्यांमध्ये ६३% रुग्ण आहेत.

उत्तर प्रदेशची आकडेवारी

नोएडामध्ये शुक्रवारी डेंग्यूचे 12 नवीन रुग्ण आढळले. यासह, शहरातील रुग्णांची संख्या 286 वर पोहोचली, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. मेट्रो हॉस्पिटल नोएडाचे सल्लागार आणि विभाग प्रमुख डॉ रमित सिंह संभ्याल यांनी न्यूज 9 ला सांगितले की, “इमर्जन्सी वॉर्डमधल्या (emergency ward) सरासरी 10 पैकी 7 रुग्ण डेंग्यूसाठी पॉझिटिव्ह आढळत आहेत. एका दिवसात आम्हाला इमर्जन्सी वॉर्डमध्ये 50-60 रुग्ण आढळतायेत, त्यापैकी निम्म्याहून अधिक डेंग्यूचे रुग्ण आहेत.”

आग्रामध्ये, 2021 मध्ये आतापर्यंत किमान 350 लोकांना डेंग्यूचे निदान झाले आहे जे गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापैकी बहुतेक रूग्ण गेल्या दोन महिन्यांत आढळून आली आहेत. याशिवाय जिल्ह्यात 78 बालकांसह तब्बल 95 जणांचा तापाने मृत्यू झाला आहे. मात्र, डेंग्यूमुळे केवळ एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. गेल्या 50 दिवसांत तापाने त्रस्त रुग्णांच्या 18,000 हून अधिक नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 350 डेंग्यूच्या रुग्णांची पुष्टी झाली आहे.

वेक्टर ब्रीडिंग नष्ट करणे आवश्यक

WHO ने म्हटले आहे की, साथीच्या रोगाचा आणि डेंग्यूच्या साथीचा एकत्रित परिणामाचा धोका जास्त लोकसंख्या असलेल्या भागात आसतो. भारतात कोरोना महामारी आजून संपलेली नाही. डेंग्यूच्या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेक्टर ब्रीडिंग (vector breeding spots) नष्ट करणे आवश्यक आहे. डासांसाठीजे फॉगिंग (fogging) केले जाते ते केवळ डासांना मारून टाकते, ब्रीडिंग त्याने संपत नाही.

dengue outburst north india delhi punjab up affected

इतर बातम्या 

मोठी बातमी: देशातील आणखी 13 विमानतळं खासगी कंपन्यांच्या ताब्यात जाणार

वानखेडेंविरोधात एनसीबीच्याच एका अधिकाऱ्याचं निनावी पत्रं, 26 प्रकरणं दिली, चौकशी व्हावी; नवाब मलिक यांची मागणी