AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: देशातील आणखी 13 विमानतळं खासगी कंपन्यांच्या ताब्यात जाणार

Airport | भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. आम्ही पीपीपी तत्त्वावर चालवण्यासाठीच्या 13 विमानतळांची यादी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला पाठवली आहे. त्यानुसार यंदाच्या आर्थिक वर्षाच्या शेवटापर्यंत या विमानतळांची लिलाव प्रक्रिया पार पाडण्याचे प्रयत्न केले जातील, असे संजीव कुमार यांनी सांगितले.

मोठी बातमी: देशातील आणखी 13 विमानतळं खासगी कंपन्यांच्या ताब्यात जाणार
विमानतळ
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 12:20 PM
Share

नवी दिल्ली: येत्या काही महिन्यांत केंद्र सरकारकडून देशातील आणखी 13 विमानतळांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. या विमानतळांचा ताबा सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे (AAI) आहे. परंतु, मार्च 2022 पर्यंत या विमानतळांचा कारभार खासगी कंपन्यांच्या हातात सोपवला जाईल. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय चलनीकरण (नॅशनल मॉनिटायझेशन) योजनेची घोषणा केली होती. या माध्यमातून तोट्यात असलेल्या सरकारी उपक्रमांच्या मालमत्ता विकून निधी उभारण्याची योजना आहे. त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील 13 विमानतळांचे खासगीकरण होणार आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. आम्ही पीपीपी तत्त्वावर चालवण्यासाठीच्या 13 विमानतळांची यादी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला पाठवली आहे. त्यानुसार यंदाच्या आर्थिक वर्षाच्या शेवटापर्यंत या विमानतळांची लिलाव प्रक्रिया पार पाडण्याचे प्रयत्न केले जातील, असे संजीव कुमार यांनी सांगितले.

लिलाव प्रक्रिया कशी पार पडणार?

संबंधित हवाई मार्गांवरील प्रत्येक प्रवाशापाठी मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन विमानतळांचा लिलाव केला जाईल. यापूर्वी अशा पद्धतीने लिलावप्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे संजीव कुमार यांनी म्हटले.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने गेल्याच महिन्यात 13 विमानतळांच्या खासगीकरणाला मंजुरी दिली होती. यामध्ये सहा मोठ्या आणि सात लहान विमानतळांचा समावेश आहे. केंद्र सरकारने 2024 पर्यंत राष्ट्रीय चलनीकरण योजनेच्या माध्यमातून सरकारी मालमत्तांची विक्री करून 3660 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

कोणत्या विमानतळांचा समावेश?

खासगीकरण प्रस्तावित असलेल्या 13 विमानतळांमध्ये वाराणसी, कुशीनगर, गया, अमृतसर, कांग्रा, भुवनेश्वर आणि तिरुपती या सहा बड्या विमानतळांचा समावेश आहे. तर लहान विमानतळांमध्ये रायपूर, औरंगाबाद, इंदौर, जबलपूर, त्रिची आणि हुबळी यांचा समावेश आहे. राष्ट्रीय चलनीकरण योजनेतंर्गत येत्या चार वर्षात देशातील एकूण 25 विमानतळांचे खासगीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने डोळ्यांसमोर ठेवले आहे. यामध्ये सध्याच्या 13 विमानतळांचा समावेश आहे.

यापूर्वी 2019 मध्ये केंद्र सरकारने अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, तिरुवनंतपुरम, मंगळुरू आणि गुवाहाटी या सहा विमानतळांचा कारभार पीपीपी तत्त्वावर अदानी समूहाकडे सोपवला होता. तर जुलै 2021 मध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचा ताबाही अदानी समूहाकडे गेला होता.

ही सर्व विमानतळे पुढील 50 वर्षे अदानी समूहाच्या ताब्यात असतील. या काळात या विमानतळांचा विकास, प्रशासकीय कामकाज आणि देखभाल अदानी समूहाकडून करण्यात येईल. अदानी समूहाकडून देशातील अधिकाअधिक विमानतळांचा कारभार हाती घेण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

देशातले सर्व विमानतळं अदानी समूहाकडे? केंद्र सरकारनं काय दिलं उत्तर? वाचा,

Video: मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, ‘अदानी एअरपोर्ट’वर संतप्त, जोरदार तोडफोड

Video : शिवसैनिकांनी ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड फोडला, आता अदानी कंपनीकडून स्पष्टीकरण!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.