5

देशातले सर्व विमानतळं अदानी समूहाकडे? केंद्र सरकारनं काय दिलं उत्तर? वाचा,

केंद्र सरकार एअरपोर्ट अथॉरिटीज ऑफ इंडियाकडून 6 विमानतळ अदानी समूहाला PPP तत्वावर देत आहे का असा सवाल तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता.

देशातले सर्व विमानतळं अदानी समूहाकडे? केंद्र सरकारनं काय दिलं उत्तर? वाचा,
मुंबई विमानतळ
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 4:52 PM

मागच्या काही दिवसांपासून विमानतळांच्या खासगीकरणाचा (Airport Privatisation) मुद्दा प्रचंड गाजतोय. विशेतः अदानी समुहाला (Adani Group) विमानतळ चालवायला देण्यावरून अनेक मतमांतरे समोर येत आहेत. अशात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून विमानतळांच्या खासगीकरणावर उत्तर देण्यात आलं आहे. (The central government answered the question whether all the airports in the country are owned by the Adani group)

विमानतळ खासगीकरणावरून सरकारला सवाल

केंद्र सरकार एअरपोर्ट अथॉरिटीज ऑफ इंडियाकडून 6 विमानतळ अदानी समूहाला PPP तत्वावर देत आहे का असा सवाल तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता. याशिवाय कोरोनाच्या कारणामुळे विमानतळ हस्तांतरणाला विलंब होत असल्यानं त्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी अदानी समुहानं एअरपोर्ट अथॉरिटीजकडे केली होती का असा सवालही महुआ मोईत्रा यांनी विचारला.

ज्‍योतिरादित्‍य सिंधिया यांनी दिलं उत्तर

सरकारच्या वतीनं नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. सिंधिया यांनी सांगितलं की, ”एअरपोर्ट अथॉरिटीने अहमदाबाद, जयपूर, उत्तर लखनौ, गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि मंगलुरू या 6 विमानतळांना ‘बेस्ट एअरपोर्ट’ पुरस्काराने सन्मानित केलं आहे. या विमानतळांचं नियोजन आणि विकासाची जबाबदारी अदानी इंटरप्राईजेस लि. ला 50 वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे. सोबतच कोरोनाकाळात अहमदाबाद, लखनौ आणि मंगलुरू विमानतळांचा ताबा घेण्यास अदानी समुहाने 205 दिवसांची वेळ मागितली होती,” असंही सिंधिया यांनी आपल्या उत्तरात सांगितलं.

देशातले सर्व विमानतळ अदानी समुहाकडे?

गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या माहितीनुसार एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे देशातल्या 136 विमानतळांचा ताबा आहे. यापैकी दिल्‍ली, मुंबई, चंडीगढ़ आणि नागपूर या 4 विमानतळांवर एअरपोर्ट अथॉरिटीने ज्‍वॉइन्‍ट वेंचर तयार केलं आहे. दुसरीकडे केंद्र सरकार काही विमानतळांमधली आपली मालकी विकण्याचा विचार करत असल्याचं समोर येत आहे. या माध्यामातून सरकार 2.5 लाख कोटी रुपये उभारण्याची सरकारची योजना आहे. यामध्ये सरकार विमानतळांमधली हिस्सेदारी विकणार आहे. (The central government answered the question whether all the airports in the country are owned by the Adani group)

इतर बातम्या : 

एडलवाईज टोकियो लाईफचा खास इन्शुरन्स प्लॅन, 100 व्या वर्षापर्यंत लाईफ कव्हर

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत घसरण, रेकॉर्ड स्तरापेक्षा 8,200 रुपयांनी स्वस्त

हिट अँड रन प्रकरणातील मृतांच्या वारसांना आणि जखमींना मिळणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम वाढणार?

Non Stop LIVE Update
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले
अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले