एडलवाईज टोकियो लाईफचा खास इन्शुरन्स प्लॅन, 100 व्या वर्षापर्यंत लाईफ कव्हर

Insurance Plan | या विमा उत्पादनामध्ये वैकल्पिक ऑफरनुसार मुलांसाठी 'चाईल्ड फ्युचर प्रोटेक्ट बेनिफिट' आणि जीवनाच्या उत्तरजिवीकेसाठी 'लिव्ह लॉन्ग बेनिफिट' समाविष्ट आहे.

एडलवाईज टोकियो लाईफचा खास इन्शुरन्स प्लॅन, 100 व्या वर्षापर्यंत लाईफ कव्हर

मुंबई: जागतिक महामारीच्या दरम्यान एकाच ठिकाणी सर्वसमावेशक सुरक्षा उपाय देण्याच्या भविष्यातील गरजांना लक्षात ठेवून एडेलवाईज टोकियो लाईफ इन्शुरन्स ने ‘टोटल प्रोटेक्ट प्लस’ ची घोषणा केली आहे. ही एक व्यापक सुरक्षा योजना आहे जी लक्ष्य निगडित वित्तीय आवश्यकतांना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वैकल्पिक लाभ देते.

या नव्या उत्पादनाबद्दल बोलताना एडेलवाईज टोकियो लाईफ इन्शुरन्सचे कार्यकारी संचालक शुभ्रजीत मुखोपाध्याय म्हणाले की, “गेल्या एक दशकात विमा उपाययोजनांच्या मागणीत वाढ होत असून या मागण्या जोखिमेला सुरक्षा देण्याच्या बाबत खूप व्यापक असतात. महामारीने या गरजांना अत्यंत जरुरीचे बनवले आहे. ‘टोटल प्रोटेक्ट प्लस’च्या मदतीने आम्हाला अपेक्षा आहे कि आम्ही ग्राहकांच्या जोखीमांना प्रबंधित करण्याच्या आणि त्यांच्या सर्व लक्ष्यीत वित्तीय गरजांना पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून एक सर्वसमावेशक उपाय देऊ. या विमा उत्पादनामध्ये वैकल्पिक ऑफरनुसार मुलांसाठी ‘चाईल्ड फ्युचर प्रोटेक्ट बेनिफिट’ आणि जीवनाच्या उत्तरजिवीकेसाठी ‘लिव्ह लॉन्ग बेनिफिट’ समाविष्ट आहे.

“या दिवसांत लक्ष्य आधारित वित्तीय नियोजनाविषयी अत्यंत जागरूकता आहे कारण यामध्ये सेवानिवृत्ती आणि खऱ्या सुरक्षेचा विचार ग्राहकांच्या मनात आहे. या उत्पादनाला डिझाईन करतेवेळी आमचा प्रयत्न आहे कि आमचा प्रयत्न सर्वोत्तम मूल्य असलेला प्रस्ताव असेल जो सध्याच्या गरजांमधील अंतराला समजेल. हे कुठल्याही नव्या उत्पादनासंदर्भात असो किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या ऑफर देण्याच्या पद्धतीबाबत असो, असे मुखोपाध्याय यांनी सांगितले.

या प्लॅनची प्रमुख वैशिष्ट्ये

* यात तुम्हाला 100 वयवर्षापर्यंत कव्हर मिळते, परिणामी तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी वारस रूपाने सोडू शकता
* वैकल्पिक ‘बेटर हाफ बेनिफिट’ मिळतो जो तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या पती-पत्नीला कव्हर प्रदान करतो
* ‘रिटर्न ऑफ प्रीमियम बेनिफिट’ ज्यामुळे तुमचा विम्याचा अवधी पूर्ण झाल्यानंतर भरलेल्या एकूण प्रिमीयमच्या १००% रक्कम परत मिळण्याची सुविधा मिळते
* पाच, सात, दहा, पंधरा आणि 20 वर्षांसाठी नियमित भरणा किंवा हफ्त्यांचा मर्यादित भरणा करण्याचा विकल्प देतो
* विमा खरेदी केल्यानंतर 7 दिवसांच्या मेडिकल चाचणी पूर्ण केल्यास पहिल्या वर्षी हफ्त्यावर सहा टक्के सूट प्रदान केली जाते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI