Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत घसरण, रेकॉर्ड स्तरापेक्षा 8,200 रुपयांनी स्वस्त

Gold price | आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली. 0.1 टक्क्यांच्या घसरणीसह सोन्याचा भाव 1,810.50 डॉलर्स प्रतिऔंसापर्यंत खाली आला.

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत घसरण, रेकॉर्ड स्तरापेक्षा 8,200 रुपयांनी स्वस्त
Gold Silver Price

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून विशिष्ट मर्यादेत वर खाली असलेल्या सोन्याच्या दरात बुधवारी पुन्हा घसरण नोंदवली गेली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज सोन्याच्या किंमतीमध्ये 0.9 टक्क्यांची घसरण होऊन ते प्रतितोळा 47,847 च्या पातळीला जाऊन पोहोचले. तर चांदीच्या दरात 0.19 टक्क्यांची घसरण झाली असून हा दर प्रतिकिलो 67,471 रुपये इतका झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली. 0.1 टक्क्यांच्या घसरणीसह सोन्याचा भाव 1,810.50 डॉलर्स प्रतिऔंसापर्यंत खाली आला. तर अमेरिकन वायदे बाजारातही सोन्याची 1,812.40 डॉलर्सच्या पातळीपर्यंत घसरण पाहायला मिळाली.

राज्यातील स्थानिक बाजारपेठांमध्ये सोन्याचा भाव?

मुंबई- 46950 रुपये प्रतितोळा
पुणे- 46,220 रुपये प्रतितोळा
नागपूर- 46950 रुपये प्रतितोळा
नाशिक- 46,220 रुपये प्रतितोळा

रेकॉर्ड स्तरापेक्षा 8200 रुपयांनी स्वस्त

गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या स्तरापेक्षा सोने सध्या 8200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, आगामी काळात सोन्याचा भाव पुन्हा वाढेल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे.

पाच वर्षात सोनं 90 हजारांवर?

आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.

याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Gold Price: पाच वर्षात सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार, एक तोळा सोन्याचा दर 90 हजारांवर?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI