योगी सरकार बरखास्त करा, काँग्रेस नेते नसीम खान यांची मागणी

उत्तर प्रदेशात वाढतल चाललेले अत्याचार हे योगी सरकारचं अपयश आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करा, अशी मागणी माजी मंत्री काँग्रेस नेते नसीम खान यांनी केली आहे. (Dismiss Yogi Goverment Demand Congress Leader Nasim Khan)

योगी सरकार बरखास्त करा, काँग्रेस नेते नसीम खान यांची मागणी

मुंबई : उत्तर प्रदेशात वाढत चाललेले अत्याचार हे योगी सरकारचं अपयश आहे. त्यामुळे योगी सरकार तातडीने बरखास्त करा त्याशिवाय देशाच्या लोकशाहीचे उच्चाटन होणार नाही, अशी घणाघाती टीका माजी मंत्री काँग्रेस नेते नसीम यांनी केली. (Dismiss Yogi Goverment Demand Congress Leader Nasim Khan)

संसदेतील कामगार व शेतकरी विरोधी विधेयक, उत्तर प्रदेशातील दलित समाजातील मुलींवर वाढत असलेले अत्याचार आणि हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना केलेल्या धक्काबुक्कीचा तीव्र निषेध करत त्यांनी चांदिवली विधानसभा मतदारसंघात आंदोलन केले.

मोदी आणि योगी सरकार देशाचे लोकतंत्र व देशाचा कायदा मोडण्याचे काम करीत आहे. संसदेत मोदी सरकारने कामगार व शेतकरी विरोधी विधेयक सत्तेच्या जोरावर मंजूर करून घेतला जो की कामगार आणि शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. मोदी सरकारप्रमाणे उत्तर प्रदेशात योगी सरकारही दलित समाजावर वाढत असलेल्या अत्याचाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका नसीम खान यांनी केली.

हाथरस पीडित कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पायी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अडवणूक करून धक्काबुक्कीचा प्रकार म्हणजे कायद्याची पायमल्ली करण्यासारखे आहे. मोदी आणि योगी सरकारचा निषेध करून, हे सरकार बरखास्त केल्याशिवाय देशाच्या लोकशाहीचे उच्चाटन होणार नाही, असं ते म्हणाले.

हाथरस प्रकरण उत्तर प्रदेशातील हाथरस इथं एका मुलीवर बलात्कार झाल्याचा (Hathras rape case) आरोप आहे. चार नराधमांनी सामूहिक अत्याचार करुन मारहाण केली. यादरम्यान प्रचंड जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हाथरस प्रकरणावर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांकडून गुपचूप अंत्यसंस्कार हाथरस (Hathras) सामूहिक बलात्कार (GangRape) प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करत, बोलता येऊ नये म्हणून तिची जीभदेखील कापून टाकली. उपचार दरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. पीडितेचा मृतदेह तिच्या गावी आणून, उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) गुपचूप या मुलीचे अंत्यसंस्कार उरकल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आला आहे. विनवणी करूनही पोलिसांनी मुलीचे अंत्यदर्शन करू न दिल्याने, कुटुंबियांनी आक्रोश केला आहे

राहुल गांधींना धक्काबुक्की दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी-प्रियांका गांधी यांना, काल उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं होतं. यादरम्यान राहुल गांधींना पोलिसांनी धक्काबुक्कीही केली होती. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र काही वेळाने त्यांना सोडण्यात आले.

(Dismiss Yogi Goverment Demand Congress Leader Nasim Khan)

संबंधित बातम्या

हाथरस अत्याचारातील पीडित कुटुंबाला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल, नवी मुंबईत मनसे आक्रमक

हाथरसच्या मुलीवर बलात्कार झालाच नाही, यूपीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा दावा

Hathras rape case | मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवा, शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी

पंतप्रधान बोलत का नाहीत?; जनतेला हाथरसच्या घटनेचं सत्य सांगा; शिवसेनेची मागणी

Published On - 11:02 pm, Fri, 2 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI