Hathras rape case | मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवा, शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी

हाथसर बलात्कार प्रकरणानंतर योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. (Hathras rape case mumbai police Pratap Sarnaik)

Hathras rape case | मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवा, शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 1:47 PM

मुंबई : हाथरस प्रकरणी (Hathras rape case) मुंबईत गुन्हा नोंदवून, मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (HM Anil Deshmukh) यांच्याकडे केली आहे. प्रताप सरनाईक यांनी ट्वीट करुन उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर (Yogi Adityanath) हल्लाबोल केला. प्रताप सरनाईक म्हणाले, “देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी विनंती करतो”. (handover Hathras rape case to mumbai police demands Pratap Sarnaik )

हाथरस येथील बलात्कार पीडित तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात असंतोष निर्माण झाला. बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे.

हाथरस प्रकरण

उत्तर प्रदेशातील हाथरस इथं एका मुलीवर बलात्कार झाल्याचा (Hathras rape case)आरोप आहे. चार नराधमांनी सामूहिक अत्याचार करुन मारहाण केली. यादरम्यान प्रचंड जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हाथरस प्रकरणावर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांकडून गुपचूप अंत्यसंस्कार

हाथरस (Hathras) सामूहिक बलात्कार (GangRape) प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करत, बोलता येऊ नये म्हणून तिची जीभदेखील कापून टाकली. उपचार दरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. पीडितेचा मृतदेह तिच्या गावी आणून, उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) गुपचूप या मुलीचे अंत्यसंस्कार उरकल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आला आहे. विनवणी करूनही पोलिसांनी मुलीचे अंत्यदर्शन करू न दिल्याने, कुटुंबियांनी आक्रोश केला आहे

राहुल गांधींना धक्काबुक्की दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी-प्रियांका गांधी यांना, काल उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं होतं. यादरम्यान राहुल गांधींना पोलिसांनी धक्काबुक्कीही केली होती. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र काही वेळाने त्यांना सोडण्यात आले.

SIT ची स्थापना उत्तर प्रदेशचे गृह सचिव भगवान स्वरुप यांच्या अध्यक्षतेखाली SIT ची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात डीआयजी चंद्रप्रकाश आणि आयपीएस पूनम यांच्यासह एकूण तीन सदस्य असतील. या पथकाला आपला अहवास सात दिवसांच्या सादर करण्याचे आदेश आहेत. तशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. तसेच हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कुठलीही दया न करता बाजू प्रभावीपणे मांडण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे.

(handover Hathras rape case to mumbai police demands Pratap Sarnaik )

संबंधित बातम्या

उत्तर प्रदेशात 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

Rahul Gandhi | उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं

UP Police | राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांची धक्काबुक्की; संतप्त कार्यकर्त्यांची पोलिसांविरोधात निदर्शने 

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.