तंबाखू उत्पादनांची जाहिरात करु नका, कॅन्सर पीडिताचे अजय देवगणला साकडं

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

जयपूर : समाजाच्या कल्याणासाठी तंबाखू उत्पादनाची जाहिरात करु नका असे आवाहन राजस्थानच्या जयपूर येथील एका कॅन्सर पीडित व्यक्तीने बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला केलं आहे. नानकराम (40) असं या कॅन्सरपिडीत व्यक्तीचं नाव आहे. तो अजय देवगणचा खूप मोठा चाहता आहे, अजय देवगण तंबाखू उत्पादनाची जाहिरात करतो हे पाहून नानकरामनेही या उत्पादनांचे सेवन सुरु केले आणि यामुळे त्याला कॅन्सरसारख्या […]

तंबाखू उत्पादनांची जाहिरात करु नका, कॅन्सर पीडिताचे अजय देवगणला साकडं
Follow us on

जयपूर : समाजाच्या कल्याणासाठी तंबाखू उत्पादनाची जाहिरात करु नका असे आवाहन राजस्थानच्या जयपूर येथील एका कॅन्सर पीडित व्यक्तीने बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला केलं आहे. नानकराम (40) असं या कॅन्सरपिडीत व्यक्तीचं नाव आहे. तो अजय देवगणचा खूप मोठा चाहता आहे, अजय देवगण तंबाखू उत्पादनाची जाहिरात करतो हे पाहून नानकरामनेही या उत्पादनांचे सेवन सुरु केले आणि यामुळे त्याला कॅन्सरसारख्या महाभंयकर आजार झाला अशी खंत त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

नानकरामने बॉलिवूड अभिनेते अजय देवगण यांना संबोधित करत जयपूरच्या सांगानेर, जगतपुरा आणि इतर जवळपासच्या परिसरामध्ये एक हजार पत्रक वाटले आणि भितींवर चिपकवले. यामध्ये तंबाखुचं सेवन केल्याने कशाप्रकारे तो आणि त्याचं कुटुंब उध्वस्त झालं याबाबत सांगण्यात आलं आहे.

“माझे वडील नानकराम मीणा यांनी काही वर्षांपूर्वी तंबाखुचं सेवन करण्यास सुरुवात केली. ते त्याचं उत्पादनाचं सेवन करायचे ज्याची जाहिरात अजय देवगण करतात. माझे वडील अजय देवगण यांचे चाहते आहेत. त्यामुळे त्यांनी या तंबाखू उत्पादनाचं सेवन करण्यास सुरुवात केली. मात्र, काही दिवसांनी त्यांना कॅन्सर झाल्याचं समजलं. त्यामुळे इतक्या मोठ्या कलाकाराने अशाप्रकारच्या जाहिराती करु नये, अशी त्यांचं म्हणणं आहे”, अशा माहिती नानकराम यांचा मुलगा दिनेश मीणा याने दिली.

जयपूरमध्ये वितरित करण्यात आलेल्या पत्रकात त्याने मद्य, सिगारेट आणि तंबाखू-गुटखा यांसारख्या अम्लीपदार्थांच्या जाहिराती करणे चुकीचे आहे, असं सांगितलं आहे. या प्रकारच्या समाजाला घातक असलेल्या पदार्थांच्या जाहिराती करु नये असे आवाहन या पत्रकाद्वारे केलं आहे.

नानकराम यांना दोन मुलं आहेत. कॅन्सर होण्यापूर्वी त्यांचं चहाचं दुकान होतं. पण, आता ते बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना सांगानेर परिसरात दुध विक्री करुन आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह चालवावा लागत आहे.