Maharashtra Election News LIVE : वॉर्ड क्रमांक 9 मधून भाजपकडून कोणाला उमेदवारी?
BMC, Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यात येत आहेत. प्रत्येक क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या...

LIVE NEWS & UPDATES
-
सरकारमध्ये कोणालाही बोलण्याची मुभा नाही : के.सी. पाडवी
नंदूरबार – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कोणालाही बोलण्याची मुभा नाही. सत्तेत राहायचं असेल तर गपचूप राहावा लागणार, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी मंत्री के.सी. पाडवी यांनी भाजपवर निशाणा साधला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशाही सारखे करत आहे. कारण आदिवासींमध्ये लढवय्या नेते राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस हा बोगसांच्या बाजूने आहेत. बोगस लोकांना साथ देणार माणूस आहे, अशीही टीका त्यांनी केली.
-
किरकोळ कारणातून 23 वर्षीय युवकाला बेदम मारहाण
सातारा शिरवळ येथे किरकोळ कारणातून 23 वर्षीय युवकाला बेदम मारहाण. पुणे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू. आतिश राऊत असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव. शिरवळ पोलीस ठाण्यासमोर युवकाचा मृतदेह ॲम्बुलन्समध्ये आणल्यामुळे ग्रामस्थांची पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी. युवकाला केलेल्या मारहाणी नंतर मारेकरी झाले होते फरार. 12 तासात शिरवळ पोलिसांनी 3 संशयित आरोपींना केली अटक. मारेकऱ्यांनी जखमी युवकाच्या अपघाताचा बनाव केल्याने शिरवळ ग्रामस्थ संतप्त. या घटनेच्या निषेधार्थ आज शिरवळ बंद.
-
-
जयकुमार गोरे यांनी घेतला सोलापुरी हुरड्याचा आस्वाद
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला सोलापुरी हुरड्याचा आस्वाद. महापालिका निवडणुकीच्या धामधूमीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भारतीय बैठक मांडत हुरडा पार्टीला हजेरी लावली. कार्यकर्त्याने केलेल्या आग्रहाला मान देत सिनाई ऍग्रो टुरिझम सेंटरला भेट देत हुरडा पार्टीत सहभाग नोंदवला. ग्रामीण संस्कृती, शेतीप्रधान जीवनशैली व पारंपरिक खाद्यपरंपरा जपणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण देखील उपस्थित होते.
-
वॉर्ड क्रमांक 9 मधून भाजपकडून कोणाला उमेदवारी?
भाजपने बोरिवली वॉर्ड क्रमांक 9 मधून माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. शिवा शेट्टी हे यापूर्वी 2012 मध्ये काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. शिवा शेट्टी यांनी सर्व पक्ष नेत्यांचे आभार मानले.
-
मुंबई काँग्रेसकडून वॉर्ड क्रं 26 मधून कोणाला उमेदवारी?
मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांना प्रभाग क्रमांक 26 मधून काँग्रेसची उमेदवारी जाहीर. सुरेशचंद्र राजहंस हे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
-
-
ठाकरे गटाचे वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरून खान यांच्यावर मोठी जवाबदारी
वर्सोवा विधानसभा मतदारसंघात सहा वॉर्ड असून सहा बॉर्डर ठाकरे गटाने आपला उमेदवार दिला आहे. मध्यरात्री साडेबारा वाजता आमदार हारून खान यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सहा उमेदवारांना मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ए बी फॉर्म देण्यात आले आहेत. यावेळी मुंबईचा महापौर मराठी असेल आणि तो ठाकरेचाच असेल असा दावा आमदार हरून खान यांनी केला आहे…
-
भिवंडीत आचारसंहिता भंगाचा माजी महापौर विलास पाटील यांचे विरोधात गुन्हा दाखल
निवडणूक काळात म्हाडा कॉलनी संगम पाडा परिसरात रस्ता बनवण्याचे काम सुरू केले होते. स्थानिकांनी हरकत घेत विरोधकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. विलास पाटील, मुलगा मयुरेश पाटील व इतर तीन अशा पाच जणांविरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
-
उमरगा तालुक्यातील डाळींब परिसरात बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
शेतात उमटलेले बिबट्याच्या पायाचे ठसे तपासण्यासाठी वनविभागाची टीम डाळींब परिसरात दाखल झाली आहे. वनविभागाने लवकरात लवकर पिंजरे लावून या बिबट्याला जेरबंद करावे अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. डाळींब गावात दवंडी देऊन परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
दहा महिन्यांपासून फरार असलेला ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार अखेर अटक
तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरणातील गेल्या दहा महिन्यांपासून फरार असलेला आणि या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार अतुल श्याम अग्रवाल याला अटक करण्यात तामलवाडी पोलिसांना यश आले आहे. मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरातून तपास पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. या प्रकरणात आतापर्यंत ३९ आरोपींना अटक करण्यात आली असून, अग्रवालच्या अटकेमुळे ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये ज्या जागेचा तिढा सुटला अशा जागेवरील उमेदवाराना भाजपाच्या वतीने AB फॉर्म वाटण्यात येत आहेत . रात्री 01 वाजल्या पासून दादर येथील वसंत स्मृती भाजपा कार्यालयाबाहेर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे. तर आता महायुतीच्या जागेबाबतचा तिढा लवकरच सुटणार आहे. महायुती संदर्भातील अवघ्या काही जागांवरची चर्चा बाकी आहे. जागा वाटप अंतिम टप्प्यात असून लवकरच निर्णय घोषित करणार आहेत. घटकपक्षासोबत झालेल्या बैठकीत सर्वच सकरात्मक असल्याचं चित्र देखील दिसून आलं. नगर महापालिकेत 68 जागेसाठी निवडणूक होणार आहे. हवामानबद्दल देखील मोठी अपडेट समोर येत आहे. गोंदिया जिल्ह्याचा पारा 9 अंशांवर आला असून. कमाल व किमान तापमान घसरल्यामुळे थंडीचा जोर वाढला आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
Published On - Dec 29,2025 8:06 AM
