मोदी आवडतात, पण आताच त्यांच्याशी व्यापार करार नाही : ट्रम्प

| Updated on: Feb 19, 2020 | 12:52 PM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा 24 आणि 25 फेब्रुवारी असा दोन दिवसांचा भारत दौरा असणार आहे (USA president Donald Trump).

मोदी आवडतात, पण आताच त्यांच्याशी व्यापार करार नाही : ट्रम्प
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी मोठं विधान केलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडतात. मात्र, भारतासोबत आताच व्यापारी करार करणार नाही”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. ते अमेरिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा 24 आणि 25 फेब्रुवारी असा दोन दिवसांचा भारत दौरा असेल. या दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका दरम्यान महत्त्वाचे व्यापारी करार होतील, अशी आशा भारताला होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांना व्यापारी करार होणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत साशंकता व्यक्त केली.

“माझी भारतासोबत मोठा व्यापारी करार करायची इच्छा आहे. आम्ही तो करार निश्चित करणारही आहोत. मला माहित नाही की, हा करार अमेरिकेच्या निवडणुकीअगोदर होईल का? मात्र, भविष्यात निश्चित करार करु”, असं डोनाल्ड ट्रम्प (USA president Donald Trump) यांनी सांगितलं.

“स्वागतासाठी विमानतळ आणि दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रम स्थळी तब्बल 70 लाख लोक उपस्थित राहतील, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. यावेळी त्यांनी भारत-अमेरिका व्यापारी संबंधावरही भाष्य केलं. “भारताने आमच्यासोबत चांगला व्यवहार केला नाही. मात्र, मला नरेंद्र मोदी खूप आवडतात. त्यामुळे भारत दौऱ्यातून बऱ्याच आशा आहेत”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. याअगोदर वॉशिंग्टन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी आपली उत्सुकता व्यक्त केली होती. “भारतातील लाखो नागरिक माझ्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे मी भारत दौऱ्याची तयारी करत आहे”, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.