नाशिकमध्ये पोलिसाची गुंडगिरी, बील मागितल्याने बार चालकाला मारहाण

| Updated on: Feb 02, 2020 | 11:47 AM

कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसानेच कायदा पायदळी तुडवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नाशकात पोलिसाची गुंडगिरी पाहायला मिळाली.

नाशिकमध्ये पोलिसाची गुंडगिरी, बील मागितल्याने बार चालकाला मारहाण
Follow us on

नाशिक : कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसानेच कायदा पायदळी तुडवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नाशकात पोलिसाची गुंडगिरी पाहायला मिळाली (Police Beat Hotel Owner). या पोलीस अधिकाऱ्याने सराईत गुन्हेगाराच्या मदतीने एका बार चालकाला मारहाण केली. या प्रकरणी अंबड पोलिसांत या गुंडगिरी करणाऱ्या पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Police Beat Hotel Owner).

नाशिकच्या लेखा नगर भागात हा सर्व प्रकार घडला. येथील बार स्पॅक्समध्ये पोलीस कर्मचारी भगवान एकनाथ जाधव हा त्याच्या साथीदारांसोबत बिअर घेण्यासाठी गेला होता. बिअर घेतल्यानंतर बारचालक भास्कर येतप्पा शेट्टी याने जाधव यांच्याकडे पैशांची मागणी केली. यावर दादागिरी करत ‘मी पोलीस असून तुला बघून घेतो’, असं म्हणत भगवान जाधव यांनी बार चालकाला शिवीगाळ केली. त्यानंतर भगवान जाधवने त्याच्या साधीदारांसोबत मिळून या बार चालकाला मारहाणही केली. पोलीस कर्मचारी भगवान एकनाथ जाधवसोबत असलेले त्यांचे साधीदार हे सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे.

बार चालकाला मारहाण केल्याच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता पोलीस यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.