लखनऊमध्ये काश्मिरी विक्रेत्यांना विश्व हिंदू दलाकडून मारहाण

लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये काश्मिरी नागरिकांवर हल्ला करण्यात आला. विश्व हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांनी काश्मिरींना मारहाण केली. मारहाण झालेले काश्मिरी नागरिक हे उत्तर प्रदेश, दिल्ली परिसरात सुका मेवा विक्रीचं काम करतात. काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करणारे हेच काश्मिरी असल्याच्या रागातून, या विक्रेत्यांना मारहाण करण्यात आली. डालीगंज पूल परिसरात भगवे कपडे घालून आलेल्या काही गुंडांनी, काश्मीरमध्ये […]

लखनऊमध्ये काश्मिरी विक्रेत्यांना विश्व हिंदू दलाकडून मारहाण
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये काश्मिरी नागरिकांवर हल्ला करण्यात आला. विश्व हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांनी काश्मिरींना मारहाण केली. मारहाण झालेले काश्मिरी नागरिक हे उत्तर प्रदेश, दिल्ली परिसरात सुका मेवा विक्रीचं काम करतात. काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करणारे हेच काश्मिरी असल्याच्या रागातून, या विक्रेत्यांना मारहाण करण्यात आली.

डालीगंज पूल परिसरात भगवे कपडे घालून आलेल्या काही गुंडांनी, काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना धडा शिकवण्याच्या इराद्याने मारहाण केली.

काश्मिरी विक्रेते बुधवारी सुकामेवा विकत होते. त्यावेळी भगवे कपडे घालून आलेल्या या गुंडांनी त्यांना ओळखपत्र विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली.

आधी मारहाण, नंतर फेसबुकवर व्हिडीओ

काश्मिरी विक्रेत्यांना मारहाण केल्यानंतर विश्व हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ सोशल साईट्सवर पोस्ट केला. फेसबुकवर दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये काश्मिरी तरुण काहीवेळ मार खातो, त्यानंतर तो आपलं साहित्य सोडून पळू जाताना दिसतो.

दुसऱ्या व्हिडीओमध्ये एका काश्मिरी तरुणाला काही लोक थप्पड मारताना दिसतात, तर काहीजण त्याच्याकडे आधारकार्ड मागत आहेत.

लोकांनी जीव वाचवला

दरम्यान, ही मारहाण सुरु असताना उपस्थित काही जणांनी मध्यस्थी करत, या विक्रेत्यांची सुटका केली. त्यावेळी काश्मिरी तरुणाने आपलं आधारकार्डही दाखवलं.

VIDEO: