मोठ्या भावाचा मृ्त्यू झाला म्हणून लहान भावाला मारहाण; त्र्यंबकेश्वरमध्ये नक्की काय घडले?

| Updated on: Feb 21, 2023 | 9:33 AM

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्तेच्या पिंपळाचा पाडा येथील भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई या दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. भीमा यांच्या सख्ख्या भावाचा मृत्यू झाला.

मोठ्या भावाचा मृ्त्यू झाला म्हणून लहान भावाला मारहाण; त्र्यंबकेश्वरमध्ये नक्की काय घडले?
जादूटोण्याच्या संशयातून दिराने वहिनीला संपवले
Image Credit source: TV9
Follow us on

नाशिक / चैतन्य गायकवाड (प्रतिनिधी) : अंधश्रद्धेच्या संशयावरून वृद्ध दाम्पत्याला जबर मारहाण करण्यात आली. सख्ख्या भावाच्या मृत्यूप्रकरणी वृद्धाला भुताळा, तर त्यांच्या वृद्ध महिलेला भुताळीण ठरवून जबाबदार धरण्यात आले. याच कारणावरून वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली गेल्याचा धक्कादायक प्रकार त्र्यबंकेश्वरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला असून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करणाऱ्या आरोपींविरुद्ध हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हस्तक्षेपानंतर कारवाई

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्तेच्या पिंपळाचा पाडा येथील भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई या दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. भीमा यांच्या सख्ख्या भावाचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला वृद्ध भीमा आणि भागीबाई यांनी केलेला मंत्र, जादूटोणा कारणीभूत ठरले, असा संशय नागरिकांनी घेतला.

दोघांना भुताळा, भुताळीण ठरवून जबाबदार धरण्यात आले आणि त्यांना मारहाण करण्यात आली. अंधश्रद्धेतून हा सगळा प्रकार घडल्याचे समजताच या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हस्तक्षेप केला आणि सातत्याने पाठपुरावा करून पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले आहे.

हे सुद्धा वाचा

भाऊबंदकीतील लोकांनी केली मारहाण

भीमा तेलवडे यांच्या मोठ्या भावाचा गुजरातच्या मोहपाडा येथे दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पुतणीकडे वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कळमुस्ते या मूळ गावी आणण्यात आला. मात्र मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूला भीमा तेलवडे आणि त्यांच्या पत्नी भागीबाई यांनी केलेले मंत्र-तंत्र, जादूटोणा कारणीभूत ठरल्याचा संशय घेण्यात आला.

भाऊबंदकीतील काही जणांनी हा आरोप केला आणि त्यातूनच त्यांनी भीमा व त्यांच्या पत्नी भागीबाई यांना जबर मारहाण केली. यात भीमा यांच्या डोक्याला, तर भागीबाई यांच्या छातीला जखम झाली आहे.

दोषींवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी

तेलवडे दाम्पत्याला झालेल्या जबर मारहाणीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी. तसेच या घटनेबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये जादूटोणाविरुद्ध कलम लावण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने करण्यात आली आहे. अशा घटना आदिवासी भागात सातत्याने घडत आहेत. त्यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याबाबत पोलिसांसह नागरिकांमध्ये प्रशिक्षण आणि जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे.