रायगडमध्ये वीज सुरु करण्यासाठी आलेल्या वर्ध्याच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोना

| Updated on: Jul 04, 2020 | 7:50 PM

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील 20 कर्मचारी पेणमध्ये गेले (Electricity Department 3 Person Corona Positive) होते.

रायगडमध्ये वीज सुरु करण्यासाठी आलेल्या वर्ध्याच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोना
Follow us on

वर्धा : निसर्ग चक्रीवादळात कोकणातील खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेले वीज वितरण विभागाच्या 3 कर्मचाऱ्यांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 22 झाली आहे. वर्ध्यातील एकूण 20 कर्मचारी कोकणात गेले होते. (Electricity Department 3 Person Corona Positive who visit Raigad Nisarga cyclone)

निसर्ग चक्रीवादळात कोकणात मोठया प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये वीज वितरण विभागाचे सुद्धा मोठे नुकसान झाले. या भागातील खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील 20 कर्मचारी पेणमध्ये गेले होते. यातील 20 पैकी 6 कर्मचारी हिंगणघाट विभाग, 5 आर्वी विभाग आणि 9 वर्धा विभागाचे आहेत.

हे कर्मचारी 1 जुलैला रात्री परत आले. त्यापैकी वर्धा विभागाच्या 7 लोकांना 2 जुलैला सामान्य रुग्णालयात दाखल करून त्यांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी तिघांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. यात 52 वर्ष, 37 वर्ष आणि 43 वर्षीय पुरुषांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

हे कर्मचारी आजी, पिपरी मेघे आणि वर्धा येथील समता नगर मधील आहेत. त्यांना सावंगी येथील विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर कर्मचाऱ्यांना घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यानंतर आता त्यांचीही कोरोना चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत 22 कोरोना रुग्ण आढळले. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 12 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.जिल्ह्यात सध्या ९ कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहे. (Electricity Department 3 Person Corona Positive who visit Raigad Nisarga cyclone)

संबंधित बातम्या : 

Murlidhar Mohol Corona | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाचा संसर्ग

Wardha Rain | वर्ध्यात पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू, 12 वर्षीय नातू आणि आजोबाही बुडाले