अवैध दारुविक्रीविरोधात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 5 कोटींचा मुद्देमाल जप्त

| Updated on: Apr 14, 2020 | 8:47 AM

राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई सुरूच (Illegal Liquor selling During lockdown) आहे.

अवैध दारुविक्रीविरोधात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 5 कोटींचा मुद्देमाल जप्त
Follow us on

मुंबई : टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद (Illegal Liquor selling During lockdown) आहेत. राज्यात 12 एप्रिल 2020 रोजी 64 गुन्हे नोंदविण्यात आले. तर 34 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 11 वाहने जप्त करण्यात आली असून 18 लाख रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तर 24 मार्च ते 12 एप्रिल पर्यंत पूर्ण टाळेबंदी कालावधीमध्ये (Illegal Liquor selling During lockdown) राज्यात 2 हजार 447 गुन्हे नोंदविण्यात आले आहे. त्याशिवाय 971 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 126 वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्याशिवाय 5 कोटी 89 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई सुरूच आहे. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 24×7 नियंत्रण कक्ष सुरू आहे .

सदर नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक 18008333333 तर व्हाट्सअँप क्रमांक 8422001133 आहे. यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. सदर नमूद क्रमांकावर अवैध मद्य बाबतची तक्रार नोंद करण्यात यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले (Illegal Liquor selling During lockdown) आहे.