गिरीश महाजन यांच्यासमोर माजी आमदाराला लाथा बुक्क्यांनी मारहाण

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

जळगाव: भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले नेते गिरीश महाजन यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला. पालकमंत्री गिरीश महाजनांसमोर कार्यकर्त्यांनी भाजपचे माजी आमदार बी एस पाटील यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. जळगावमधील भाजपच्या सभेत हा राडा झाला. इतकंच  नाही तर गिरीश महाजन यांनाही खाली खेचण्यात आलं. गिरीश महाजन यांनी काही कार्यकर्त्यांना ढकलून दिलं. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी […]

गिरीश महाजन यांच्यासमोर माजी आमदाराला लाथा बुक्क्यांनी मारहाण
Follow us on

जळगाव: भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले नेते गिरीश महाजन यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला. पालकमंत्री गिरीश महाजनांसमोर कार्यकर्त्यांनी भाजपचे माजी आमदार बी एस पाटील यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. जळगावमधील भाजपच्या सभेत हा राडा झाला. इतकंच  नाही तर गिरीश महाजन यांनाही खाली खेचण्यात आलं. गिरीश महाजन यांनी काही कार्यकर्त्यांना ढकलून दिलं. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी हा राडा थांबवण्याचा प्रयत्न केला.

भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी भाजपचे माजी आमदार बी. एस. पाटलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जळगाव येथील सभेत भाजप कार्यकर्त्यांचा राडा झाला. गिरीश महाजन यांच्या समोरच हा राडा झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी शिवसेना नेते गुलाबराव पाटीलही उपस्थित होते.

या सर्व राडेबाजीनंतर  जळगाव जिल्ह्यातील भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. कार्यकर्त्यांची पोलिसांसोबतही झटापट झाली. पोलीसही खाली पडले.  गिरिश महाजन यांनी कार्यकर्त्यांना नियंत्रित करताना कार्यकर्त्यांना ढकलले. स्वतः गिरीश महाजन यांच्यावर कार्यकर्त्यांना खाली ढकलण्याची नामुष्की आली.

आधी तिकीट जाहीर करुन नंतर तिकीट कापलं
जळगावातील भाजपमधील खदखद काही दिवसांपूर्वीच समोर आली. काँग्रेस पाठोपाठ भाजपनेही आपला उमेदवार बदलला. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. काही दिवसांपूर्वी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर असताना, त्यांना डावलून त्यांच्या जागी भाजपने 3 एप्रिलला उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. महत्त्वाचं म्हणजे भाजपने विद्यमान खासदार ए टी पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता स्मिता वाघ यांच्याही तिकीटावर खाट मारुन, उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सध्या जळगाव भाजप अध्यक्षपदी स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ आहेत. विद्यमान खासदार ए टी पाटील यांचं तिकीट कापून  स्मिता वाघ यांना तिकीट दिल्याने ए टी पाटील नाराज होते. मग स्मिता वाघ यांचं तिकीट कापल्याने उदय वाघ नाराज झाले. या नाराजीनंतर उदय वाघ समर्थकांनी आज भाजपचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण केली.

संपूर्ण व्हिडीओ

 

संबंधित बातम्या

भाजपमध्येही कलह, जळगावचा उमेदवार ऐनवेळी बदलला  

एबी फॉर्मसह अर्ज भरलेला असताना तिकीट कापलं, स्मिता वाघ यांची हतबल प्रतिक्रिया  

ए. टी. पाटील गप्प राहा, मी बोललो तर पंचाईत होईल : गिरीश महाजन