एबी फॉर्मसह अर्ज भरलेला असताना तिकीट कापलं, स्मिता वाघ यांची हतबल प्रतिक्रिया

जळगाव : भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून पक्षाने चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाने घेतलेल्या या निर्णयाबाबत आमदार स्मिता वाघ यांचे समर्थक नाराज झाले आहेत. जळगावात त्यांच्या निवासस्थानी जळगाव लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते जमले होते. त्यांनी पक्षाच्या या निर्णयाविरोधात …

एबी फॉर्मसह अर्ज भरलेला असताना तिकीट कापलं, स्मिता वाघ यांची हतबल प्रतिक्रिया

जळगाव : भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून पक्षाने चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाने घेतलेल्या या निर्णयाबाबत आमदार स्मिता वाघ यांचे समर्थक नाराज झाले आहेत. जळगावात त्यांच्या निवासस्थानी जळगाव लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते जमले होते. त्यांनी पक्षाच्या या निर्णयाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षात आम्ही 40 वर्षांपासून निष्ठेने काम करत आहोत. परंतु एबी फॉर्मसह अर्ज भरलेला असताना आमचं तिकीट कापून चार वर्षांपूर्वी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. प्रामाणिकता आणि निष्ठा हा कदाचित माझ्या स्वभावातील दोष असेल. तरीही आम्ही पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा निष्ठेने प्रचार करणार आहोत, असे मत जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या तिकीट रद्द केलेल्या उमेदवार स्मिता वाघ यांनी व्यक्त केले.

भाजपने उमेदवारी का बदलली?

जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या अंतर्गत कलहामुळे उमेदवारी कापल्याचं सांगण्यात येत आहे. जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जळगावात आता उन्मेष पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर यांच्यात लढत होणार आहे.

विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांच्या बंडांचा फटका बसण्याची शक्यता, तसंच राष्ट्रवादीचे उमेदवार माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या तुलनेत स्मिता वाघ कमकुवत ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांच्या ऐवजी चाळीसगावचे भाजप आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

भाजपला जाहीर केलेला उमेदवार बदलावा लागल्याची ही पहिलीच घटना ठरली. आधी गिरीश महाजन यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा सुरु होती. पण आता उन्मेष पाटलांचे नाव निश्चित झाल्याने, जळगावमधील राजकीय वातावरण बदलून गेलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *