लॉकडाऊनदरम्यान कामगारांना पगार न दिल्याने कंपनीविरोधात गुन्हा, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

| Updated on: Apr 23, 2020 | 8:32 PM

कामगारांचे वेतन न दिल्याने हिंगणघाटच्या मोहता इंडस्ट्रीज विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे (FIR against Mohota Company in Wardha).

लॉकडाऊनदरम्यान कामगारांना पगार न दिल्याने कंपनीविरोधात गुन्हा, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
Follow us on

वर्धा : कोरोना नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या स्थितीत कामगारांचे हाल होऊ नये म्हणून सरकारकडून अनेक सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्याचं पालन होताना दिसत नाही. वर्धा जिल्ह्यामध्ये असंच एक प्रकरण समोर आलं आहे. कामगारांचे वेतन न दिल्याने हिंगणघाटच्या मोहता इंडस्ट्रीज विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे (FIR against Mohota Company in Wardha). स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. या कंपनीतील सर्व 607 कामगारांना वेतन देण्याबाबतही त्यांनी आदेश दिले आहेत.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे 125 वर्ष जुनी मोहता इंडस्ट्रीज कंपनी आहे. या कंपनीत काम करणाऱ्या गिरणी कामगारांना मागील 2 महिन्यांपासून वेतनच देण्यात आलं नाही. अखेर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या आदेशानुसार संचालकांविरुद्ध आज हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात कोरोना या संसर्गजन्य साथीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कंपन्यांना लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी व कामगार यांना कामावरुन कमी करु नये, त्यांच्या वेतनात कपात करु नये, कामगारांना संचारबंदीमुळे कामावर येता आले नाही, तर कामावर नसलेला कालावधी गृहीत धरु नये आणि ती पगारी रजा समजण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे असतानाही येथील मोहता इंडस्ट्रीजने लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मोहता इंडस्ट्रीजच्या कामगारांना वेतनाची रक्कम दिलेली नाही.

मोहता इंडस्ट्रीजला वारंवार सरकारी पातळीवरुन सूचना देऊनही त्यांनी वेतन देण्याबाबत चालढकल केली. त्यामुळे अखेर जिल्हाधिकारी भीमनवार यांनी हिंगणघाट पोलिसांना मोहता इंडस्ट्रीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज मोहता इंडस्ट्रीजचे संचालक विनोदकुमार मोहता, प्रशांत जैन आणि अन्य 7 संचालकांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 सह कलम 2, 3, 4 साथीचे रोग अधिनियम 1897, 11 महाराष्ट्र कोविड-19, विनिमय 2020 या कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या 14 वरून 5 वर : आरोग्यमंत्री राजेश टोपे]

बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपयांसाठी अर्जाची गरज नाही, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार

स्पेशल रिपोर्ट : सोलापुरात कोरोनाची एन्ट्री नेमकी कशी झाली?

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेसह 5 योजनांतील लाभार्थींना 3 महिन्याचे मानधन एकत्र मिळणार

FIR against Mohota Company in Wardha