बांगलादेशात आधी स्फोट, नंतर आग, 56 जणांचा होरपळून जागीच मृत्यू

बांगलादेशात आधी स्फोट, नंतर आग, 56 जणांचा होरपळून जागीच मृत्यू

ढाका (बांगलादेश) : बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये बुधवारी रात्री उशिरा मोठी घटना घडली आहे. येथील एका इमारतीमध्ये भीषण आग लागल्याने 56 लोकांचा मृत्यू झाला आहे. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या इमारतीमध्ये आग लागली आहे तिथे केमिकलचे गोदाम होते. यामुळे ही आग विझवणे कठीण होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

गॅसचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. काल रात्री 10.40 च्या सुमारास आग लागली आहे आणि ती वाढतच आहे. सकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले नाही. सिलेंडरमध्ये आग लागल्याने आग वाढतच आहे आणि गोदामातील केमिकलच्या कंटेनरपर्यंत आग पोहचल्याने आगीने भीषण असे रुप घेतले आहे, असं अग्निशमन दलाचे अधिकारी अली अहमद यांनी सांगितले.

आग लागलेल्या इमारतीत फक्त गोदाम नसून तेथे लोकही राहत होती. आतापर्यंत 20 पेक्षा अधिक मृतदेह सापडले आहेत. तर अजून मृतदेह काढणे बाकी आहेत. आग विझवल्यानंतर येथे सर्च ऑपरेशन सुरु करण्यात येईल. आग लागल्यामुळे सध्या तेथे मोठ्याप्रमाणात धुर झाला आहे. यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत.

व्हिडीओ :

Published On - 9:09 am, Thu, 21 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI