Sunburn 2020 | गोव्यातील प्रसिद्ध ‘सनबर्न इलेक्ट्रिक डान्स म्युझिक’ महोत्सव यंदा रद्द!

| Updated on: Nov 10, 2020 | 6:50 PM

कोरोनाची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता ‘सनबर्न इलेक्ट्रिक डान्स म्युझिक’ महोत्सव अखेर रद्द करण्यात आला आहे.

Sunburn 2020 | गोव्यातील प्रसिद्ध ‘सनबर्न इलेक्ट्रिक डान्स म्युझिक’ महोत्सव यंदा रद्द!
Follow us on

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत. यामुळे गोवा (Goa) सरकारने यंदाचा ‘सनबर्न इलेक्ट्रिक डान्स म्युझिक’ महोत्सव (Sunburn festival 2020) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकारने यापूर्वी या महोत्सवाला मान्यता दिली होती. पण, राज्यातील भाजप सरकारला यासाठी बरीच टीका सहन करावी लागली. त्यानंतर अखेर आता हा महोत्सवच रद्द करण्यात आला आहे (Goa Government cancels Sunburn festival 2020 due to corona).

गोवा सरकारने ‘सनबर्न’ला परवानगी दिल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने शुक्रवारी (6 नोव्हेंबर) शहरात निदर्शने केली. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी गोवा राज्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी जाहीर केले की, ‘सनबर्न 2020’च्या आयोजकांना देण्यात आलेली परवानगी विभागाने मागे घेतली आहे. आपल्या निवेदनात ते म्हणाले की, ‘गोव्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोन विषाणू संसर्गाचा धोका असल्याने आम्ही लोकांना मोठ्या प्रमाणात एकत्रित जमू देऊ इच्छित नाही.’

कोरोना संसर्गाची भीती

कोरोनाची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता ‘सनबर्न इलेक्ट्रिक डान्स म्युझिक’ महोत्सव अखेर रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी आयोजित होणाऱ्या या महोत्सवाला देशातूनच नव्हे तर, जगभरातून अनेक पर्यटक हजेरी लावत असतात. मात्र, यंदा कोरोनाचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे(Goa Government cancels Sunburn festival 2020 due to corona).

‘सनबर्न इलेक्ट्रिक डान्स म्युझिक’ महोत्सव 2020, 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत उत्तर गोव्यातील वॅगाटर गावात होणार होता. गोवा राज्यातही कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याने सदर महोत्सव रद्द करण्यास तयार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सुरुवातीला सामाजिक अंतर पाळून हा कार्यक्रम आयोजित केला जाईल, असे म्हटले गेले होते. परंतु, आता गोवा सरकारने यावर कठोर पावले उचलून हा संपूर्ण महोत्सव रद्द केला आहे.

(Goa Government cancels Sunburn festival 2020 due to corona)