Gold prices today : ऐन महागाईत सोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीही स्वस्त

| Updated on: Mar 16, 2021 | 2:50 PM

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 44,930 रुपयांच्या पातळीवर व्यापार करत आहे.

Gold prices today : ऐन महागाईत सोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीही स्वस्त
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय बाजारात सोने-चांदीमध्ये (Gold-Silver) पुन्हा एकदा घसरण झाल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 44,930 रुपयांच्या पातळीवर व्यापार करत आहे. त्याशिवाय चांदी 0.2 टक्क्यांनी घसरून 67,510 रुपये प्रतिकिलोवर व्यापार करत आहे. मागील व्यापार सत्रात सोन्याच्या किंमतीत 0.35 आणि चांदीच्या किमतीत 1.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (gold and silver price today on 16 march 2021 check multi commodity price here)

विक्रमी पातळीवरून सोन्याच्या किंमती आतापर्यंत 11000 रुपयांनी घसरत आहेत. त्याचबरोबर चांदीही सुमारे 11 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोन्याची किंमत 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. ऑगस्टमध्ये सोन्याचा विक्रम 56,200 च्या विक्रम पातळीवर होता. आता या वर्षाबद्दल बोलायचं झालं तर सोन्यात जवळपास 6 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

महानगरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोन्याच्या भावाविषयी बोलायचं झालं तर आज राजधानी दिल्लीमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48160 रुपये आहे. याव्यतिरिक्त चेन्नईमध्ये 46120 रुपये, मुंबईत 44,830 आणि कोलकातामध्ये 46940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

जागतिक मार्केटमध्ये सोन्या-चांदीचे भाव

जागतिक मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती 1,732.32 डॉलर प्रति औंस होती. तर चांदीचा भाव 0.04 डॉलरच्या घसरणीसह 26.20 डॉलरवर पोहोचला.

दर वाढले तरी सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही

सोने खरेदीला भारतामध्ये मोठा वाव आहे. सोन्याचा दर 50 हजारांच्या वरपर्यंत गेला होता. पण भारतीयांची सोने खरेदीबाबत एक मानसिकता आहे. त्यामुळे सोन्याचा दर 70 हजारांवर गेला तरी लोक सोनं खरेदी करतील. त्यामुळे त्याचा सोने खरेदीवर फारसा फरक पडणार नाही. लोकं सोनं खरेदी करणं बंद करणार नाहीत”, असंही काही जाणकारांचं मत आहे.

सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. (gold and silver price today on 16 march 2021 check multi commodity price here)

संबंधित बातम्या – 

10 हजारात घर बसल्या सुरू करा बिझनेस, सोप्या पद्धतीने महिन्याला लाखोंची कराल कमाई

Kalyan Jewellers IPO : 18 मार्चपर्यंत पैसे कमावण्याची मोठी संधी, 86 रुपये गुंतवा आणि बक्कळ कमवा

‘या’ बँकेमध्ये खातं असल्यास बसेल आर्थिक फटका, 1 एप्रिलपासून प्रत्येक व्यवहारासाठी द्यावे लागणार पैसे

तुमच्याकडे बाईक किंवा कार असेल तर आधी करा हे काम, अन्यथा होईल नुकसान

(gold and silver price today on 16 march 2021 check multi commodity price here)