लग्नाच्या हॉलमधून 17 तोळे सोनं चोरीला, शिर्डीत धक्कादायक प्रकार

| Updated on: Dec 07, 2019 | 12:02 AM

राहता शहरातील कुंदन लॉनमधील शाही लग्न सभारंभाच्या कार्यक्रमातून 17 तोळे सोने चोरीला गेल्याचा  धक्कादायक प्रकार उघडकीस आला (Shirdi theft in marriage hall) आहे.

लग्नाच्या हॉलमधून 17 तोळे सोनं चोरीला, शिर्डीत धक्कादायक प्रकार
Follow us on

नाशिक :  शिर्डीतील राहता शहरातील कुंदन लॉनमधील शाही लग्न सभारंभाच्या कार्यक्रमातून 17 तोळे सोने चोरीला गेल्याचा  धक्कादायक प्रकार उघडकीस आला (Shirdi theft in marriage hall) आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला (Shirdi theft in marriage hall) आहे. विशेष म्हणजे या लग्नातून 17 तोळे सोन्यासह 10 हजार रोख असा एकूण 7 लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास करण्यात आला (Shirdi theft in marriage hall) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीतील राहाता येथील कुंदन लॉन्समध्ये ही घटना शुक्रवारी रात्री 7.30 च्या सुमारास घडली. श्रीरामपूर येथील उद्योजक मुळे यांच्या कुटुंबातील विवाहासाठी डॉ मंजुषा कुलकर्णी नंदिग्राम कॉलनी औरंगाबाद येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बहिणीने ग्रे रंगाची पर्स त्यांच्याकडे दिली होती. त्यांच्या बहिणीने ती पर्स शेजारच्या मोकळ्या खुर्चीवर ठेवली आणि त्या नातेवाईंकाशी बोलत होत्या.

त्याचवेळी अज्ञाताने नजर चुकवून ती पर्स पळवली. या पर्समध्ये दोन राणी हार, साडेतीन तोळे असलेले दोन कानातले जोड, 7 तोळे वजन असलेले साखळी मनी आणि पदक, नेकलेस, चार बांगड्या, दोन अंगठ्या, एक ब्रॅसलेट, सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल, एटीएम, पावर बँक असे साहित्य होते. यात जवळपास 17 तोळे सोने, तसेच 10 हजार रुपये रोख असा सुमारे सात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी (Shirdi theft in marriage hall) चोरला.

याप्रकरणी मंजुषा कुलकर्णी यांनी राहता पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लॉन्समधील सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले असता त्यांना एक संशयित तरुण हातात पर्स घेऊन जाताना दिसत आहे. सध्या पोलिस या तरुणाचा शोध घेत आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राहता शहरातील मंगल कार्यालयात अशा चोरीच्या अनेक घटना घडल्या आहे. तसेच या कार्यालयाच्या बाहेरही मंगळसूत्र चोरीच्या घटनाही घडल्या होत्या. त्या गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे.