Lockdown 4.0 | लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काय सुरु, काय बंद?

| Updated on: May 17, 2020 | 7:54 PM

रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता सक्त संचारबंदी लागू करण्यात आली आहे (Ministry of Home Affairs (MHA) issues guidelines for Lockdown 4)

Lockdown 4.0 | लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काय सुरु, काय बंद?
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने याबाबतची घोषणा केली. लॉकडाऊन 4.0 ची नवी नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमाने, मेट्रो-लोकल सेवाही बंदच राहणार आहे. तर शाळा-कॉलेज बंदच राहणार असून ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारांवर जास्त जबाबदारी  सोडण्यात आली आहे. (Ministry of Home Affairs (MHA) issues guidelines for Lockdown 4)

रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता सक्त संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 65 वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक किंवा आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडू नये, असेही या नियमावलीत स्पष्ट केले आहे.

काय सुरु काय बंद?

1. डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार
2. मेट्रोसेवा बंद राहणार
3. शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद, ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन
4. हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार
5. सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार बंद राहणार. तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम प्रेक्षकांविना उघडू शकतात
6. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
7. सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार

हेही वाचा : Lockdown 4 | महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ

देशात आता पाच झोन

  • ग्रीन
  • ऑरेंज
  • रेड
  • कंटेन्मेंट
  • बफर

कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात पुढील गोष्टींना मर्यादांसह परवानगी

1. होम डिलिव्हरी करणारी हॉटेल आणि कॅटीन सुरु राहणार
2. पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हॉटेल चालू राहणार
3. सरकारी अधिकारी, अडकलेल्यांसाठी हॉटेल चालू राहणार
4. आंतरराज्य प्रवासी गाड्या आणि बसने वाहतूक (दोन्ही राज्यांच्या परवानगीने)
5. राज्याने ठरवलेली जिल्हांतर्गत गाड्या आणि बसने वाहतूक

(Ministry of Home Affairs (MHA) issues guidelines for Lockdown 4)

– रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत सक्त संचारबंदी, जीवनावश्यक सेवा वगळता
– 65 वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडू नये

नियम आणि अटी

बाजारपेठ उघडण्याच्या नियमांचा निर्णय राज्य घेईल
आंतरराज्य बसेस चालवण्याचा निर्णय राज्य घेईल
लग्नात 50 पेक्षा जास्त पाहुण्यांना परवानगी नाही
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दंडनीय अपराध
मास्क घालणे अनिवार्य आहे
लॉकडाऊनचे उल्लंघन करणे कायदेशीर गुन्हा
अंतिम संस्कारात 20 पेक्षा जास्त नागरिकांना परवानगी नाही
किमान कर्मचारी कार्यालयात बोलवावेत, थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक
केंद्र सरकारकडून राज्य सरकारांवर जास्त जबाबदारी
सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप केल्यावर कारवाई

लॉकडाऊन कसा वाढत गेला?

पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल (21 दिवस)
दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे (19 दिवस)
तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे (14 दिवस)
चौथा लॉकडाऊन – 18 मे ते 31 मे (14 दिवस)