Lockdown 4.0 | देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन, शाळा-कॉलेज, मेट्रो-लोकल बंद राहणार

देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या संख्येमुळे देशभरातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ करण्यात (India Lockdown Extension) आली.

Lockdown 4.0 | देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन, शाळा-कॉलेज, मेट्रो-लोकल बंद राहणार
Follow us
| Updated on: May 17, 2020 | 7:59 PM

नवी दिल्ली : भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला (India Lockdown Extension) आहे. देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या संख्येमुळे देशभरातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने याबाबतची घोषणा केली.

लॉकडाऊन 4.0 च्या नव्या नियमावली जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा-कॉलेज बंदच राहणार आहे. तसेच मेट्रो-लोकल सेवाही बंदच राहणार असेही यात नमूद करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, आता देशात रेड, ऑरेंज, ग्रीन झोन व्यतिरिक्त बफर आणि कंटेन्मेंट झोन असे पाच झोन असतील.

‘हे’ बंदच राहणार

1.. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार 2. मेट्रो, लोकल सेवा बंद राहणार 3. शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद, ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन 4. हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार 5. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी 6. विवाह, सोहळे, सभा-समारंभांवरील बंदी कायम 7. सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार बंद राहणार

कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात पुढील गोष्टींना मर्यादांसह परवानगी

  • होम डिलिव्हरी करणारी हॉटेल आणि कॅटीन सुरु राहणार
  • पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हॉटेल चालू राहणार
  • सरकारी अधिकारी, अडकलेल्यांसाठी हॉटेल चालू राहणार
  • आंतरराज्य प्रवासी गाड्या आणि बसने वाहतूक (दोन्ही राज्यांच्या परवानगीने)
  • राज्याने ठरवलेली जिल्हांतर्गत गाड्या आणि बसने वाहतूक

रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता सक्त संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 65 वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडू नये, असेही या नियमावलीत स्पष्ट केले आहे.

दरम्यान जिल्ह्यातील झोननुसार नियमावली राज्य सरकारला ठरवता येणार आहे. मात्र रेड झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच रेड झोनमधील लोकांच्या येण्या-जाण्यावर बंदी असणार आहे. कंटेनमेंट झोन आणि बफर एरिया जिल्हाधिकारी ठरवणार आहेत.

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र मोठमोठे मॉल प्रतिबंधित क्षेत्रात बंद राहणार आहेत. तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम प्रेक्षकांविना उघडू शकतात, असेही यात स्पष्ट केलं आहे.

लॉकडाऊन 4.0 ची नियमावली

  • देशभरात रेड, ऑरेंज, ग्रीन झोन व्यतिरिक्त बफर आणि कंटेन्मेंट असे पाच झोन
  • दोन्ही राज्यांच्या परवानगीने आंतरराज्य प्रवासी गाड्या आणि बसने वाहतूक करता येणार
  • लग्न सभारंभात फक्त 50 लोकांना सहभागी होता येणार
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड आकारणार
  • देशात नाईट कर्फ्यू जारी
  • 65 वर्षांवरील नागरिक आणि 10 वर्षाखाली लहान मुलांना बाहेर पडण्यास मनाई
  • मास्कचा वापर बंधनकारक
  • लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
  • अत्यंसंस्कारादरम्यान केवळ 20 लोकांना परवानगी
  • कमीत कमी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवता येणार, ऑफिसमध्ये थर्मल स्क्रीनिंग गरजेचे

हेही वाचा – Lockdown 4 | महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन लॉकडाऊन 4 ची घोषणा केली होती. त्यानुसार सर्व राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. दरम्यान यापूर्वी महाराष्ट्र, पंजाब आणि तामिळनाडू सरकारने लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती.

लॉकडाऊन कसा वाढत गेला?

  • पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल (21 दिवस)
  • दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे (19 दिवस)
  • तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे (14 दिवस)
  • चौथा लॉकडाऊन – 18 मे ते 31 मे (14 दिवस)

देशात 25 मार्चपासून पहिला लॉकडाऊनचा टप्पा सुरु झाला. 21 दिवसांचा पहिला टप्पा 14 एप्रिलला संपला. दुसरा लॉकडाऊन 15 एप्रिल ते 3 मे असा होता. तिसरा लॉकडाऊन 3 मे रोजी सुरु होऊन 17 मेपर्यंत चालला. 17 मेनंतर चौथ्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आढावा घेऊन सूचना द्यावा, असे पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना (India Lockdown Extension) सांगितले होते.

संबंधित बातम्या : 

Lockdown 4 : पंतप्रधान मोदींकडून ‘लॉकडाऊन 4’ ची घोषणा, 18 मे पूर्वी नियम जाहीर करणार

Lockdown 4 | महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.