तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले

| Updated on: Oct 31, 2020 | 9:23 PM

बेळगाव प्रश्न पुन्हा एकदा पेटला असून आता या वादात राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे; असे वक्तव्य केल्यानंतर ग्रामविका समंत्री हसन मुश्रीफ यांनी सवदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले
Follow us on

कोल्हापूर : बेळगाव प्रश्न पुन्हा एकदा पेटला असून आता या वादात राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे; असे वक्तव्य केल्यानंतर त्यावर महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सवदी यांच्यावर सडकून टीका केली असून ‘तुमचा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्याआधी बेळगाव महाराष्ट्रात असेल’ अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. (Hasan Mushrif slams Karnataka Deputy Chief Minister on Belgaum issue)

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून बेळगाव हा महारष्ट्रासाठी अस्मितेचा प्रश्व राहिलेला आहे. तसाच बेळगावचा भाग कर्नाटकसाठी प्रतिष्ठेचा होऊन बसला आहे. याच कारणामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रात कधी शाब्दिक चकमकी तर कधी हिंसाचारही उसळत आला आहे. त्यातच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. असं वक्वव्य केलं. ‘जोपर्यंत सूर्य, चंद्र असले तोपर्यंत बेळगाव महाराष्ट्राला मिळणार नाही’, अशी मुक्ताफळे सवदी यांनी उधळली.

सवदी यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘चंद्र-सूर्य कशाला, तुमच्या उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल’ अशी चपराक मुश्रीफ यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सवदी यांना लगावली.

बेळगावातील शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. त्यानंतर सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला होता. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जनतेमध्ये संतापाची लाट पसरली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसात (Reinstatement Of Shivaji Maharaj Statue) पुन्हा बसवण्याचे आश्वासन कर्नाटक सरकारने दिले होते.

दरम्यान, बेळगावच्या प्रश्नावरुन शिवसेनेने कायम आक्रमक भूमिका घेतलेली आहे. शिवसेना नेते संजय राऊत वेळोवळी बेळगावाला भेट देत असातात. त्यानंतर आता राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ यांनीदेखील बेळगाव प्रश्नावर प्रतिक्रिया दिल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.

संबंधित बातम्या :

शिवरायांचा पुतळा हटवणारा बोलवता धनी जगाने पाहिला, वर्तन बदला, खोतकरांचा भाजपला इशारा

Shivaji Maharaj | कुठं पुतळ्याचं दहन, तर कुठं कर्नाटक सरकारला बांगड्यांचा‌ हार, शिवभक्त आक्रमक

(Hasan Mushrif slams Karnataka Deputy Chief Minister on Belgaum issue)