वडिलांनी छातीत लाथ मारल्याने 4 वर्षीय मुलाचा मृत्यू

जळगाव : पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा हकनाक जीव गेला आहे. भांडणामध्ये रागाच्या भरात मुलाच्या वडिलांनी चार वर्षीय मुलाच्या छातीत लाथ मारली. यामुळे चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार जळगाव येथील जामनेरमध्ये काल (28 मे) घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महेश माळी असं मृत मुलाचे […]

वडिलांनी छातीत लाथ मारल्याने 4 वर्षीय मुलाचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 29, 2019 | 3:59 PM

जळगाव : पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा हकनाक जीव गेला आहे. भांडणामध्ये रागाच्या भरात मुलाच्या वडिलांनी चार वर्षीय मुलाच्या छातीत लाथ मारली. यामुळे चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार जळगाव येथील जामनेरमध्ये काल (28 मे) घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महेश माळी असं मृत मुलाचे नाव आहे.

जामनेर येथील रामेश्वर कॉलनीतील यशोदा नगरमध्ये 30 वर्षीय विवाहीत महिला आपल्या पतीसह राहते. या जोडप्याला तीन मुली आणि चार वर्षाचा मुलगा महेश होता. काल दुपारी महेशचे वडील कैलास माळी आपल्या घरी आले. त्यावेळी महेशच्या हाताला पेनाची शाई लागली होती. महेशचा शाईने रंगलेला हात पाहिल्यानंतर वडिलांचा संताप झाला. त्यानंतर त्यांनी महेशच्या आईला हाताला शाई कशी लागली, तुझं लक्ष कुठे होतं अशी विचारणा केली. या कारणावरुन या दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले. या भांडणाच्या रागात वडिलांनी चिमुकल्या महेशच्या छातीत लाथ मारली.

लाथ मारताच चार वर्षीय महेश जमिनीवर पडला. वडिलांनी छातीत लाथ मारल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यावेळी तातडीने शेजारी राहणाऱ्या महिलांनी महेशला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. महेशचा मृत्यू झाल्याची बातमी आईला कळताच तिने हंबरडा फोडला.

दरम्यान, संशयित आरोपी कैलास माळी हा घटनास्थळाहून फरार झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

Non Stop LIVE Update
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.