AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदे भाजपात जाणार? राज्यातील बड्या नेत्याने केला गौप्यस्फोट

Lok Sabha Election 2024 : भाजपने यापूर्वी राज्यात काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. अनेक पट्टीचे नेते त्यांनी गळाला लावले आहे. अशोक चव्हाण नुकतेच भाजपवासी झाले आहेत. तर आता लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे पण भाजपमध्ये जाणार असल्याचा गौप्यस्फोट राज्यातील या बड्या नेत्याने केला आहे.

Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदे भाजपात जाणार? राज्यातील बड्या नेत्याने केला गौप्यस्फोट
भाजपची धरणार वाट?
| Updated on: May 03, 2024 | 10:21 AM
Share

भाजपने गेल्या दोन वर्षांत राज्यातील राजकारणाला सर्वाधिक हादरे दिले. शिवसेना आणि राष्ट्रवादीत भूंकप घडविण्यात भाजपने त्यांची भूमिका लपवलेली नाही. भाजपने काँग्रेसमध्ये पण खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. काही पट्टीचे नेते हाताशी घेतले. अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपचा झेंडा हाती घेतला. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पण भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूक झाली की सुशीलकुमार शिंदे भाजपवासी होतील असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

काय दिले कारण

सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कारण पण आंबेडकरांनी दिले आहे. सोलापूरचे कॉग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची चौकशी लागेलेली आहे. त्यामुळे ते भाजपत जातील. माझ्या माहितीप्रमाणे शिंदे यांची चौकशी थांबवलेली आहे. ही चौकशी थांबवण्यासाठी शिंदे भाजपामध्ये जातील. संविधान बदलेल अमुक बदलेल याच्याशी त्यांना काही देणे घेणे नाही.त्यांनी जमवलेली माया वाचवणे एवढेच त्यांचे टार्गेट आहे, अशी खोचक टीका पण आंबेडकरांनी केली. ते सोलापूरमध्ये जाहीर सभेत बोलत होते.

आम्ही खातं उघडू

राज्यात आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. मागीलवेळीपेक्षा चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि आमचे खाते उघडेल असेल वाटतेय. पॉजिटीव्ह चित्र होईल, पण 4 तारखेपर्यंत आम्ही होल्ड ऑन करणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात वंचित खाते उघडणार असा दावा त्यांनी केला आहे.

मोदींवर जहरी टीका

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी सरकारचा 10 वर्षांचा कार्यकाळ काळाकुट्ट असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. व्यसनात बुडालेले लोक बापजाद्यांची मालमत्ता संपवून टाकतात. दारुड्याची वृत्ती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वृत्ती एकच असल्याची जळजळीत टीका पण आंबेडकरांनी केली.

भारताचे नागिरकत्व नाकारले

17 लाख हिंदू कुटुंबानी या दहा वर्षांत देशाचे नागरिकत्व नाकारल्याचा आरोप त्यांनी केला. हे हिंदू आता परदेशात स्थायिक झाल्याचा दावा आंबेडकरांनी केला. परदेशात गेलेल्या या हिंदूना मोदी सरकार धमक्या देत असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. त्यामुळे आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.