‘होल्ड युअर पोजीशन’चा आदेश, अवघे 21 जवान, समोर 10 हजार अफगाण… आणि घडला एक समर संग्राम

हवालदार इशर सिंग यांनी पश्तोमध्ये उत्तर दिले. त्यांची भाषा केवळ कठोरच नव्हती तर शिवीगाळही होती. ते म्हणाले, महाराजा रणजित सिंग यांची भूमी आहे. इंग्रजांची नाही आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तिचे रक्षण करू.' आणि क्षणातच 'बोले सो निहाल, सत् श्री अकाल'च्या जयघोषाने सारागढी चौकी दुमदुमली.

होल्ड युअर पोजीशनचा आदेश, अवघे 21 जवान, समोर 10 हजार अफगाण... आणि घडला एक समर संग्राम
History of Sikh Warriors in Saragarhi
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: May 07, 2024 | 9:08 PM

मुंबई : 12 सप्टेंबर 1897 रोजीची ती सकाळ. 8 वाजले होते. सारागढी किल्ल्यावर सेन्ट्री उभा होता. त्याने पाहिले समोरून दहा ते बारा हजारांचा जमाव येतोय. सेन्ट्रीने किल्ल्याचा हवालदार इशर सिंग यांना लागलीच माहिती दिली. झेंडे, भाले, रायफल घेऊन हजारो पठाणांचा एक गट उत्तरेकडून किल्ल्याच्या दिशेने येत आहे. मिळालेली माहिती भयंकर होती. हवालदार इशर सिंग यांनी जवळच्या फोर्ट लॉकहार्ट येथे तैनात असलेल्या ब्रिटीश अधिकारी कर्नल हॉटन याला परिस्थितीची माहिती दिली. त्यांना विचारले की ‘काय आदेश आहेत?’ कर्नल हॉटन याने हवालदार इशर सिंग यांना आदेश दिला, ‘होल्ड युअर पोजीशन’. हा आदेश येताच हवालदार सतर्क झाले. त्यांनी सैनिकांना आदेश दिला ‘युद्धाच्या तयारीत रहा.’ तासाभरात किल्ला तिन्ही बाजूंनी घेरला गेला. समोर होती दहा हजारांची अफगाणी फौज तर किल्ल्यात होते अवघे 21 सैनिक. मात्र, वरिष्ठांच्या आदेशानुसार त्या 21 सैनिकांनी आपली पोजीशन घेतली आणि सुरवात झाली एका महासंघर्षाला… हाच महासंघर्ष इतिहासात सारागढीची लढाई म्हणून प्रसिद्ध झाला. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा