औरंगाबादमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणातून प्रियकराच्या भावाची गळा चिरुन निघृण हत्या

औरंगाबादमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणातून प्रियकराच्या भावाची गळा चिरुन निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Honour killing in Aurangabad).

औरंगाबादमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणातून प्रियकराच्या भावाची गळा चिरुन निघृण हत्या
| Edited By: | Updated on: Mar 17, 2020 | 11:03 AM

औरंगाबाद : आंतरजातीय प्रेमप्रकरणातून औरंगाबादमध्ये प्रियकराच्या भावाची गळा चिरुन निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Honour killing in Aurangabad). प्रेमी युगल पळून गेल्यानंतर मुलीच्या भावांनी प्रियकराच्या भावाची मध्यरात्री घरात घूसून हत्या केली. ही घटना शनिवारी (14 मार्च) मध्यरात्री वैजापूर तालुक्यातील खंडाळा या गावात घडली. आरोपींनी प्रियकर तरुणाच्या आई-वडिलांनाही मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली (Honour killing in Aurangabad).

रोहिदास देवकर आणि देविदास देवकर अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी शनिवारी मध्यरात्री भीमराज गायकवाड या तरुणाची गळा चिरुन निघृण हत्या केली. भीमराजचा भाऊ आणि आरोपींची बहिण प्रेम प्रकरणातून घरातून पळून गेले. या रागातून आरोपींनी भीमराजची हत्या केली. याशिवाय भीमराजच्या आई-वडिलांनाही त्यांनी जीवघेणी मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेप्रकरणी आरोपींवर खुनाच्या गुन्ह्यासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. अखेर वैजापूर पोलिसांनी एकाला खंडाळा येथून तर दुसऱ्याला लाख खंडाळा येथून अटक केली. पोलिसांनी ही कारवाई अवघ्या चार तासात केली. या प्रकरणी आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.