
मुंबई : राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. काही नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार पुन्हा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. 50 टक्के क्षमता, थर्मल स्क्रिनिंग, हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर यांसह काही नियम सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. (Hotel, Restaurant, bar Start Again after lockdown)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार बऱ्याच दिवसांपासून बंद होते. त्यामुळे ते पुन्हा सुरु व्हावे यासाठी राज्य सरकारकडे वेळोवेळी विंनती केली होती. या विनंतीनंतर नियमावली ठरवत अनलॉक-5 अंतर्गत हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी सरकारकडून आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे. कार्यप्रणालीत दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
‘या’ नियमांचे पालन करणे गरजेचे
दरम्यान हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार सुरु करण्यासाठी मुंबई महापालिकेनेही काही नियम जारी केले आहेत. त्यामुळे मुंबईतील हॉटेल मालकांसह ग्राहकांना राज्य सरकारसह मुंबई महापालिकेच्या नियमांचंही पालन करावं लागणार आहे.
संबंधित बातम्या :
राज्यात रेस्टॉरंटस्, बार सुरु, दोन टेबलांमध्ये एक मीटरचे अंतर बंधनकारक
Unlock 5 Guidelines : राज्यात 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरु, थिएटर्स, शाळा बंदच