Unlock 5 Guidelines : राज्यात 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरु, थिएटर्स, शाळा बंदच

5 ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, थिएटर सभागृहे 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. (Unlock 5 Guidelines Hotel And Raustaurant Will Start From 5 October)

Unlock 5 Guidelines : राज्यात 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरु, थिएटर्स, शाळा बंदच
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 8:35 PM

मुंबईराज्य सरकारने अनलॉक 5 साठी महत्त्वाच्या गाईडलाईनस जारी केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील हॉटेल रेस्टॉरंट बंद होते. मात्र अनलॉकच्या दिशेने पावले टाकत असताना आता 5 ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. (Unlock 5 Guidelines Hotel And Raustaurant Will Start From 5 October)

राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरु करायला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. तसंच अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग देखील सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर देखील कसलेही निर्बंध आता नसणार आहेत.

मुंबईच्या डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तर पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसंच मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने परवानगी दिलेल्या वाहतूकीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवास बंदी घालण्यात आली आहे.

महत्त्वाचं म्हणजे 31 ऑक्टोबर पर्यंत शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंदच राहणार आहेत. त्याचबरोबर सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे बंद राहतील. तसंच मेट्रो वाहतूक देखील ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार नाही. सामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना देखील 31 ऑक्टोबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

काय सुरु?

  • 5 ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय
  • राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु
  • अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग सुरु करण्यास परवानगी
  • ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर निर्बंध नाही
  • मुंबईच्या डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी
  • पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय
  • मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवण्यास परवानगी

काय बंदच?

  • सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे 31 ऑक्टोबरपर्यंत बंद
  • शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद
  • मेट्रो वाहतूक देखील ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार नाही
  • सामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी

यासगळ्यासाठी राज्य सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे आणि कार्यपद्धतीचे पालन करणे अनिवार्य राहील.

संबंधित बातम्या

Unlock 4 | ई-पास रद्द होण्याची चिन्हं, राज्यातील अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जाहीर होणार

Unlock-4 : थिएटर उघडण्याच्या मोदी सरकारच्या हालचाली, मेट्रोही धावण्याची शक्यता, अनलॉक 4 मध्ये काय सुरु होणार?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.