AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात रेस्टॉरंटस्, बार सुरु, दोन टेबलांमध्ये एक मीटरचे अंतर बंधनकारक

कंटेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस्, बार 5 ऑक्टोबरपासून सुरु करता येतील.(state government has given permission to start restaurants and bars from October 5)

राज्यात रेस्टॉरंटस्, बार सुरु, दोन टेबलांमध्ये एक मीटरचे अंतर बंधनकारक
| Updated on: Oct 03, 2020 | 10:57 PM
Share

मुंबई : कंटेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी केल्या असून येत्या 5 ऑक्टोबरपासून क्षमतेच्या 50 टक्के एवढ्या ग्राहकांसह रेस्टॉरंट्स, बार सुरु करता येतील. तसेच दोन टेबलांमध्ये 1 मीटर अंतर ठेवणेही बंधनकारक आहे. (state government has given permission to start restaurants and bars from October 5)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बार, रेस्टॉरंट्स बऱ्याच दिसवसांपासून बंद होते. ते सुरु करण्यास राज्य सरकारने आता परवानगी दिली आहे. यासाठी बार, रेस्टॉरंट्स मालकांच्या संघटनांनी राज्य सरकारकडे वेळोवेळी विनंती केली होती. त्यामुळे अनलॉक-5 अंतर्गत हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स क्षमतेच्या 50 टक्क्यांसह सुरु करता येणार आहेत. राज्य सरकारने त्यासाठी आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे. कार्यप्रणालीत दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

आदर्श कार्यप्रणालीनुसार मालकांना हे नियम पाळावे लागणार

  • सर्व ग्राहकांची थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करावी लागणार
  • सेवा देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार
  • दोन टेबलांमध्ये किमान एक मीटरचे आंतर पाळावे लागणार
  • ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असणे बंधनकारक
  • ग्राहकांसाठी हँड सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे आवश्यक
  • परिसराचे दिवसातून दोनवेळा सॅनिटायझेशन करणे गरजेचे
  • कर्मचाऱ्यांनी एन-95 किंवा याच दर्जाचा मास्क वापरणे गरचेचे
  • करमणुकीच्या लाईव्ह कार्यक्रमास मनाई असेल
  • कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग आदीबाबत प्रशिक्षण घ्यावे
  • जेवणामध्ये शक्यतो शिजवलेल्या पदार्थांचा समावेश असावा
  • हॉटेलमधील सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे
  • सर्व कर्मचाऱ्यांची नियमित कोव्हिड चाचणी करणे अत्यावश्यक

वरील नियमांबरोबरच ग्राहकांनाही काही नियम पाळण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो जागेचे आधीच आरक्षण करावे. ग्राहकांनी वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. मिशन बिगन अगेन अंतर्गत राज्यातील आस्थापना टप्याटप्याने सरु करण्यात आल्या. मात्र, सेवा आणि आदरातिथ्य यामध्ये मोडणारे बार, हॉटेल्ससारखे व्यवसाय अजूनही बंदच होते. विविध संघटनानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यासाठी वेळोवेळी निवेदनही दिले होते. अनलॉक-5 अंतर्गत राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. त्या अंतर्गतच हॉटेल्स, बारही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

शिथिलता येताच मुंबईकर सुटले, ‘बेस्ट’साठी गर्दी, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

मिशन बिगीन अगेन | तिसरा टप्पा सुरु, कोणती बंधने कायम, कोणत्या नियमांना शिथिलता?

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, मुख्यमंत्र्यांकडून अफवांचे खंडन

(state government has given permission to start restaurants and bars from October 5)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.