लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, मुख्यमंत्र्यांकडून अफवांचे खंडन

ठाकरे सरकारच्या ‘पुनश्च हरि ओम’ अर्थात ‘मिशन बिगीन अगेन’चा तिसरा टप्पाही सुरु झाला आहे. (CM Uddhav Thackeray on Rumors of Lockdown Extension in Maharashtra)

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, मुख्यमंत्र्यांकडून अफवांचे खंडन
Follow us
| Updated on: Jun 12, 2020 | 12:36 PM

मुंबई :लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, मात्र गर्दी न करता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या अफवांचे मुख्यमंत्र्यांनी खंडन केले. (CM Uddhav Thackeray on Rumors of Lockdown Extension in Maharashtra)

“लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करु नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या” असे ट्वीट मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करणार असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ठाकरे सरकारच्या ‘पुनश्च हरि ओम’ अर्थात ‘मिशन बिगीन अगेन’चा तिसरा टप्पाही सुरु झाला आहे. कंटेन्मेंट झोन वगळता सर्वत्र पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळालेल्या सवलती तिसऱ्या टप्प्यात कायम राहतील.

काय सुरु?

1. दहा टक्के किंवा दहा (जे अधिक असेल ते) कर्मचाऱ्यांसह खासगी कार्यालये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडी राहतील. एमएमआरए (मुंबई महानगर) क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका हद्दीत सरकारी कार्यालये 15% मनुष्यबळांसह उघडतील. कर्मचारी आणि कंपनी या दोहोंना ‘कोरोना’शी संबंधित सर्व नियम पाळणे बंधनकारक असेल

2. जिल्ह्यांतर्गत बस आणि एसटी सेवा पुन्हा सुरु. बस क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी प्रवास करु शकतील. म्हणजेच एका सीटवर एकाच प्रवाशाला मुभा असेल.

काय बंद?

1. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृह, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, बार, मोठी सभागृहे उघडण्यास संमती नाही.

2. केश कर्तनालये, सलून, ब्यूटी पार्लर बंद राहणार आहेत.

3. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास अद्याप उघडणार नाहीत.

4. केंद्राने मान्यता दिली असली तरी राज्यात धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही.

5. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.

6. रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी कायम

(CM Uddhav Thackeray on Rumors of Lockdown Extension in Maharashtra)

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात राज्यात ‘या’ गोष्टी सुरु

पहिला टप्पा – सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा, केवळ इनडोअर स्टेडियममध्ये परवानगी नाही

सामुहिक (ग्रुप) अॅक्टिविटीजना परवानगी नाही, लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य, केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी

सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन, यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते.

प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत.

हेही वाचा : देशात हॉटेल, रेस्टॉरन्ट, धार्मिक स्थळं 8 जूनपासून सुरु होणार, गृहमंत्रालयाकडून नियमावली जाहीर

दुसरा टप्पा – दुसऱ्या टप्प्यात मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सवगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत एकआड एक दिवस उघडतील.

1. ट्रायल रुम बंद राहतील. कपडे परत घेणे किंवा बदलून देणे, यांना मुभा नाही 2. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांची, त्यांनी होम डिलिव्हरी, टोकन सिस्टम, मार्किंग अशी पद्धत अवलंबावी 3. जवळच्या बाजारात जाण्यासाठी पायी किंवा सायकलने जावे, आवश्यक खरेदीसाठी जवळच्या जवळ बाजारात जावे, खरेदीला जाण्यासाठी वाहनाचा वापर टाळावा

टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 2 दुचाकी – केवळ चालक

नाईट कर्फ्यू 

संपूर्ण महाराष्ट्रात रात्री 9 ते सकाळी पाच वाजेपर्यंत कडकडीत बंद राहील. यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. याशिवाय नागरिकांनाही घराबाहेर पडण्यास बंदी राहील. रात्री 9 ते सकाळी 5 यावेळतही जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू असेल.

65 पेक्षा जास्त वयोगटातील आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांनी घरातच राहावे.

(CM Uddhav Thackeray on Rumors of Lockdown Extension in Maharashtra)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.