उत्तर प्रदेशात पतीने घरातच बांधलं पत्नीचं थडगं

मेरठमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिला पुरण्यासाठी घरातच थडगं (create grave in home for wife) बांधले.

उत्तर प्रदेशात पतीने घरातच बांधलं पत्नीचं थडगं
| Edited By: | Updated on: Feb 26, 2020 | 11:18 AM

लखनऊ (उत्तर प्रेदश) : मेरठमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिला पुरण्यासाठी घरातच थडगं (create grave in home for wife) बांधले. या घटनेमुळे पोलिसांसह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सीराज यांच्या पत्नीचा आगीत भाजल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर तिला स्मशानभूमीत पुरण्याऐवजी सीराज यांनी घरातच तिचे थडगं बांधले. ही माहिती शेजारच्यांना समजताच त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना (create grave in home for wife) दिली.

सीराजची पत्नी सईदा काही दिवसांपूर्वी आगीत भाजल्यामुळे जखमी झाली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस तिच्यावर उपचार सुरु होते. उपचार करुनही सईदाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने सीराजने तिला घरी आणले. त्यानंतर (24 फेब्रुवारी) सईदाचा घरातच मृत्यू झाला.

सीराजने पत्नीचा मृतदेह पुरण्यासाठी घरातील ड्रॉइंग रुममध्ये थडगं बांधले. याची माहिती शेजारील लोकांना समजली. त्यांनी थेट पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सीराजने घरातच थडगं बांधलेले पाहून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांच्या कारवाईने आणि शेजाऱ्यांच्या दबावामुळे सीराजच्या पत्नीला स्मशानभूमीत पुरण्यात आले.

“माझ्या पत्नीला मला माझ्यापेक्षा लांब जाऊन द्यायचे नव्हते. त्यामुळे मी घरातच थडगं तयार केले”, असं सीराजने सांगितले.