विमान एका तलावातून दुसऱ्या तलावात उतरलं पाहिजे, मी प्रयत्न करतोय : गडकरी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

पुणे : रस्त्यांमुळे विरोधकांच्या स्तुतीस पात्र ठरलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आता जल वाहतुकीवर भर दिलाय. पाण्यावर उतरणारी विमान आली पाहिजे, असा मी प्रयत्न करतोय. स्वस्तात एका तलावातून उडून दुसर्‍या तलावात उतरलं पाहिजे. यामुळे नागरिकांना स्वस्तात सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. तर सहकारी बँक चळवळीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. अर्बन सहकारी बँकेचे आलेख […]

विमान एका तलावातून दुसऱ्या तलावात उतरलं पाहिजे, मी प्रयत्न करतोय : गडकरी
Follow us on

पुणे : रस्त्यांमुळे विरोधकांच्या स्तुतीस पात्र ठरलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आता जल वाहतुकीवर भर दिलाय. पाण्यावर उतरणारी विमान आली पाहिजे, असा मी प्रयत्न करतोय. स्वस्तात एका तलावातून उडून दुसर्‍या तलावात उतरलं पाहिजे. यामुळे नागरिकांना स्वस्तात सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. तर सहकारी बँक चळवळीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. अर्बन सहकारी बँकेचे आलेख अभिमानास्पद आहे. मात्र, दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरुंचं रशियन कम्ययुनिस्ट आर्थिक मॉडेल अयशस्वी ठरल्याचा दावा गडकरींनी केला. पुण्यात जनसेवा सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी सहकारी बॅकांच्या कामाचा गौरव केला. आर्थिक क्षेत्रात लीडरशिप, विश्वास प्रामाणिक आणि इमानदारी हे सर्वात मोठं कॅपिटल आसल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर टीम स्पिरीट महत्वाचं असून  संचालकांची तोंडं एका दिशेनं असणं गरजेचं आसल्याचं गडकरींनी सांगितलं.

गडकरींनी दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या आर्थिक धोरणावर आक्षेप घेतला. “नेहरुंनी रशियन कम्युनिस्ट आर्थिक मॉडेल स्वीकारलं. मात्र, आज विचार केल्यावर आर्थिक परिस्थिती बिकट आसल्याचं दिसतंय. जनतेची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. साडेपाच ते सहा लाख कोटी गुंतवणूक केली. नोटा विमान आणि सुई बनवण्यात सहभाग घेतला. पण  सरकारी उद्योग घाट्यात गेले.”, असे गडकरी म्हणाले.

“मला सिव्हिल इंजिनिअरिंगमधलं फार समजतं, हा लोकांचा गैरसमज आहे. मी जुनं घर बांधताना अनेक चुका केल्यात. मी लॉ ग्रॅज्युएट आहे. मला एवढेच कळतं की मला संधी मिळाली आहे. त्यामुळे देशासाठी कमी वेळात मी बाय हूक बाय क्रूक हे करत असतो.”, असे गडकरी म्हणाले.