तुकाराम मुंढेंचा आणखी एक दणका, नागपूर मनपातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बडतर्फ

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी एक दणका देत मनपातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाला बडतर्फ केलं आहे.

तुकाराम मुंढेंचा आणखी एक दणका, नागपूर मनपातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बडतर्फ

नागपूर : नागपूरच्या महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी एक दणका देत मनपातील (IAS Tukaram Mundhe) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाला बडतर्फ केलं आहे. महानगरपालिकेच्या गांधीबाग झोनमध्ये कार्यरत उद्यान विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रामेश्वर नंदनवारला अपव्यवहार प्रकरणात मनपा सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

रामेश्वर नंदनवार हा नागरिकांना काम करुन देण्याचे (IAS Tukaram Mundhe) आश्वासन देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचा, असा आरोप आहे. काम न झाल्यास नागरिकांना पैसे धनादेशाद्वारे परत द्यायचा, मात्र तो चेक बाउंन्स व्हायचा. यासर्व प्रकरणाची माहिती मिळताच तुकाराम मुंढे यांनी रामेश्वर नंदनवार यांना आपल्या स्टाईलने दणका दिला. तुकाराम मुंढेंनी रामेश्वर नंदनवार यांना त्यांच्या पदावरुन थेट बडतर्फ करण्याचा निर्यण दिला.

मनपामध्ये कार्यरत असताना रामेश्वर नंदनवार आणि त्यांच्या पत्नीकडे 40 लाख 87 हजार 220 रुपये ऐवढी अपसंपदा असल्याचे निष्पन्न झाले. अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा पण दाखल आहे. नंदनवार यांना त्यांच्या कार्यकाळात एकूण पाचवेळा निलंबित देखील करण्यात आले आहे. त्यांच्यावर विभागीय चौकशी होवून कायमस्वरुपी वेतनवाढ थांबविण्याची शिक्षा झाली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.

उपरोक्त जुन्या तक्रारी प्रमाणेच नव्याने तशाच तक्रारी त्याच्या विरुद्ध मनपाकडे प्राप्त झाल्या. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर कार्यरत रामेश्वर नंदनवार याच्यावरील दोषारोपाचे गांभीर्य आणि विभागीय चौकशी अधिकारी यांचा चौकशी अहवालावरील निष्कर्ष लक्षात घेता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 56 (2) (ह) अन्वये भविष्यात नोकरी मिळण्यास सामान्यपणे अपात्र होईल यारितीने त्यांना मनपा सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. यासंबंधी आदेश मनपाचे शिस्तभंग विषयक प्राधिकारी (IAS Tukaram Mundhe) तथा अतिरिक्त आयुक्तांनी दिले.

संबंधित बातम्या :

तुकाराम मुंढे यांचा धडाकेबाज एक महिना!

तुकाराम मुंढेंचा दणका, उघड्यावर लघुशंका करणाऱ्याला स्वतः पालिका कार्यालयात नेलं

तुकाराम मुंढेंची डॅशिंग कारवाई, गँगस्टर आंबेकरचा अनधिकृत बंगला पाडला

मध्येच वाजलेल्या अधिकाऱ्याचा मोबाईल जप्त, नो जीन्स, क्लीन शेव्ह, तुकाराम मुंढेंची कडक शिस्त!

Published On - 9:09 pm, Fri, 6 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI