नरेश भोरे आत्मदहन प्रकरणी सहा आरोपींपैकी चौघांचा जामीन मंजूर, मुख्यधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्याला दिलासा

| Updated on: Nov 04, 2020 | 8:28 PM

सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या आत्मदहन प्रकरणी इचलकरंजी सत्र न्यायालयाने इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांचा जामीन मंजूर केला आहे (Ichalkaranji Municipal Officers relief in Nilesh Bhore self immolation case)

नरेश भोरे आत्मदहन प्रकरणी सहा आरोपींपैकी चौघांचा जामीन मंजूर, मुख्यधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्याला दिलासा
Follow us on

कोल्हापूर : सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या आत्मदहन प्रकरणी इचलकरंजी सत्र न्यायालयाने इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, आरोग्य अधिकारी सुनील दत्त यांच्यासह आणखी दोघांचा जामीन मंजूर केला आहे. तर दोघांचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे मुख्य अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. पण या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे भोरे कुटुंबियांनी सांगितलं आहे (Ichalkaranji Municipal Officers relief in Nilesh Bhore self immolation case).

नरेश भोरे यांनी इचलकरंजी नगरपालिकेत सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून लेखी तक्रार केली होती. मात्र, या तक्रारीची कोणीही दखल न घेतल्यामुळे त्यांनी नगरपालिका आवारात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

अखेर कुणीही दखल न घेतल्यामुळे नरेश भोरे यांनी 26 ऑक्टोबर रोजी अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर इचलकरंजीत एकच खळबळ उडाली. अनेकांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

नरेश भोरे यांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनुसार इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, माजी मुख्याधिकारी दीपक पाटील, आरोग्य अधिकारी सुनील दत्त, संगेवार सुनील मिसाळ, मक्तेदार मारुती पाथरवट, सफाई कर्मचारी अमर लाखे या सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांसह इतर पाच जणांनी जामिनाचा अर्ज दाखल केला होता. यापैकी न्यायालयाने चौघांचा जामीन मंजूर केला. तर दोघांचा जामीन फेटाळला आहे (Ichalkaranji Municipal Officers relief in Nilesh Bhore self immolation case).

हेही वाचा : Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त, सेंट जॉर्जमधून 12 दिवसानंतर डिस्चार्ज