भारतात नोव्हेंबरमध्ये कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरही कमी पडणार : आयसीएमआर

| Updated on: Jun 15, 2020 | 9:28 AM

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आगामी काळात नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान भारतात कोरोनाचा सर्वाधिक धोका असेल, असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अभ्यास अहवालात म्हटलं आहे (ICMR on Corona infection peak in November).

भारतात नोव्हेंबरमध्ये कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरही कमी पडणार : आयसीएमआर
Follow us on

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आगामी काळात नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान भारतात कोरोनाचा सर्वाधिक धोका असेल, असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अभ्यास अहवालात म्हटलं आहे (ICMR on Corona infection peak in November). या काळात रुग्णांची संख्या इतकी वाढलेली असेल की देशात अतिदक्षता विभागातील (ICU) बेड आणि व्हेंटिलेटर देखील कमी पडतील, अशीही भीती अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

डिजीटल माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार आयसीएमआरच्या तज्ज्ञांच्या एका पथकाने हा संशोधन अभ्यास केला होता. यात या तज्ज्ञांनी म्हटलं आहे, “भारतात लागू करण्यात आलेल्या दिर्घ लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गाला वरच्या स्तरावर जाण्यासाठी बराच वेळ लागला. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग धोक्याच्या स्तरावर जाण्यास 34-76 दिवसांचा उशीर झाला आहे.

लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या संसर्गात 69 ते 97 टक्के घट

आयसीएमआरच्या या अहवालात म्हटलं आहे, “लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या संसर्गात 69 से 97 टक्के घट झाली. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मुलभूत आराखडा अधिक मजबूत करण्यासाठी आणि सोयीसुविधा वाढवण्यासाठी मदत मिळेल.

नोव्हेंबरच्या दरम्यान आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासणार

कोरोना संसर्गाच्या धोक्याच्या पातळीमुळे नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढेल की देशात या काळात आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची देखील कमतरता पडेल, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ही कमतरता जवळपास 5.4 महिने आयसोलेशन बेड, 4.6 महिन्यांसाठी आयसीयू बेड आणि 3.9 महिन्यांसाठी व्हेंटिलेटरची कमतरता भासेल.

नोव्हेंबरमधील स्थितीचा सामना करण्यासाठी लॉकडाऊनची गरज

लॉकडाऊची आवश्यकता सांगताना तज्ज्ञांनी म्हटलं, “कोरोना संसर्गाचा प्रकोप रोखण्यासाठी लॉकडाऊन एक परिणामकारक उपाय ठरेल. कारण या काळात चाचण्या, उपचार, लसीचं संशोधन, रुग्णांना वेगवेगळं ठेवणे आणि त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी करण्यास पुरेसा वेळ मिळेल.

नोव्हेंबर महिन्यात लॉकडाऊन लावत वेळीच योग्य पावलं उचचली गेली नाही, तर देशातील स्थिती अत्यंत गंभीर होईल, असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. यासाठी सरकारला सार्वजनिक आरोग्य सेवेच्या मुलभूत गोष्टींना अधिक मजबूत करावं लागेल. सार्वजनिक सेवेचा आवाका वाढवून त्यात 80 टक्क्यांपर्यंत रुग्णांना सामावून घेता येईल, असं बनवावं लागेल, असंही सांगण्यात आलं आहे.

सध्या देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या 3 लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात कोरोनाचे 3 लाख 20 हजार 000 रुग्ण आहेत. यात आतापर्यंत 9 हजार 195 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

संबंधित बातम्या :

नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारच्या दिशेने, रुग्णवाढ कायम

Pune Corona | पुणेकरांसाठी गुड न्यूज! कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला, तर मृत्यूदर घसरला

कोल्हापूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ओली पार्टी, नातेवाईकांकडून दारुच्या बाटल्या-मटणाची डिलीव्हरी

ICMR on Corona infection peak in November