गडचिरोली हल्ला : आयईडी ब्लास्ट इतका घातक का असतो?

| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. सकाळी रस्त्याच्या कामासाठी आणलेली तब्बल 30 वाहने नक्षलवाद्यांनी पेटवून दिली होती. त्यानंतर आता गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा परिसरात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात C-60 चे 16 जवान शहीद झाले आहेत. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. आज महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत आयईडी स्फोट (Improvised Explosive […]

गडचिरोली हल्ला : आयईडी ब्लास्ट इतका घातक का असतो?
Follow us on

गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. सकाळी रस्त्याच्या कामासाठी आणलेली तब्बल 30 वाहने नक्षलवाद्यांनी पेटवून दिली होती. त्यानंतर आता गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा परिसरात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात C-60 चे 16 जवान शहीद झाले आहेत. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. आज महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत आयईडी स्फोट (Improvised Explosive Device)  घडवला आहे. मात्र, हा काही पहिला आयईडी हल्ला नव्हे. तर याआधीही दहशतवाद्यांनी अनेक आयईडी हल्ले केले आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान व्हावे या उद्देशाने आयईडी ब्लास्ट केला जातो.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले होते. या  हल्ल्यात आयईडी वापरण्यात आले होते.

आयईडी ब्लास्ट किती घातक असतो?

आयईडी हा एकप्रकारचा बॉम्ब असतो, पण हा इतर बॉम्बपेक्षा वेगळा असतो. मोठ्या प्रमाणात नुकसान व्हावे या उद्देशाने दहशतवादी आयईडी ब्लास्ट करतात. आयईडी ब्लास्ट होताच घटनास्थळी आग लागते, कारण यामध्ये घातक अशा केमिकलचा वापर केला जातो ज्यामुळे आग लागते. दहशतवादी बहुतेकदा रस्त्याच्या कडेला आयईडी लावतात. जेणेकरुन यावर पाय पडताच किंवा गाडीचे चाक याला स्पर्श करताच स्फोट व्हावा. आयईडी ब्लास्टमध्ये धूरही मोठ्या प्रमाणात होतो.

आयईडी ब्लास्ट करण्यासाठी दहशतवादी रिमोट कंट्रोल, इंफ्रारेड, मॅग्नेटीक ट्रिगर्स, प्रेशर-सेंसिटिव्ह बार्स, ट्रीप वायर्स यांसारख्या पद्धतींचा वापर करतात. अनोकदा याला रस्त्याच्या कडेला तारेच्या मदतीने पसरवले जाते.

याआधी कुठे आणि कधी झाला आयईडी ब्लास्ट?

13 जुलै 2011 ला जम्मू-काश्मीर येथे तीन आयईडी ब्लास्ट करण्यात आले होते. हे हल्ले मुंबई येथे झालेल्या हल्ल्यांदरम्यान झाले होते. यामध्ये 19 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 130 जखमी झाले होते. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2013 रोजी हैदराबाद येथे आयईडी ब्लास्ट करण्यात आला होता. यात 17 लोकांचा मृत्यू झाला होता. 2 जानेवारी 2016 रोजी पठाणकोट येथेही आयईडी ब्लास्ट करण्यात आला होता, या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले होते. त्यानंतर 14 फ्रेबुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला घडवण्यात आला होता. यावेळी सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यावेळी आयईडी ब्लास्ट करण्यात आला होते.

गडचिरोलीत नलक्षलवाद्यांकडून भ्याड हल्ला, 16 जवान शहीद

गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांना जवानांच्या खासगी गाडीची माहिती पुरवणारे गद्दार कोण?