हरणाची कत्तल करण्यापूर्वी शिकारी ताब्यात, इंदापूर पोलिसांची कारवाई

| Updated on: Nov 01, 2020 | 6:30 PM

इंदापुरात हरणाला कापण्याच्या तयारीत असलेल्या शिकाऱ्याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलंय

हरणाची कत्तल करण्यापूर्वी शिकारी ताब्यात, इंदापूर पोलिसांची कारवाई
Follow us on

इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरानजीक सरस्वती नगरधल्या एका घरामध्ये चिंकारा जातीच्या हरणाचे पाय बांधून ठेवले होते. हरणाला कापण्याच्या तयारीत असलेल्या शिकाऱ्याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलंय. परमेश्वर अंकुश काळे (वय 33 वर्षे) राहणार सरस्वती नगर, ता. इंदापूर, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Indapur Hunter Arrested Before Chinkara Killed)

शनिवारी रात्री 31 ऑक्टोबरला आरोपीने आपल्या गोखळी-वडापुरी गावच्या हद्दीतील शेताजवळ वनीकरणातील चिंकारा हरणाला सापळा व फास्याद्वारे पकडले. हरणाला सकाळी शहरातील सरस्वती नगर भागातील आपल्या घरी आणून शस्त्राच्या साहाय्याने कापण्याच्या तयारीत असतानाच ही खबर इंदापूर पोलिसांना लागताच त्यांनी तातडीने त्याच्या घरी धाव घेत आरोपीला अटक केली.

शिकार करणाऱ्या आरोपी परमेश्वर काळेस इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन चिंकारा हरिणाची हत्या न होऊ देता त्याला जीवनदान दिले. आरोपीने यावेळी हरणाच्या पायाला बांधून ठेवले होते. तर शेजारी सत्तुर देखील पडलेला होता असे पोलिसांनी सांगितलं.

इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यासह काका पाटोळे, विशाल चौधर, विक्रम जाधव यांनी ही कारवाई केली असून इंदापूर पोलिसांकडून हा गुन्हा वन विभागाकडे वर्ग करण्यात आलाय. आरोपीकडून शिकारीबाबत कसून चौकशी सुरु असल्याचे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितलंय.

(Indapur Hunter Arrested Before Chinkara Killed)

संबंधित बातम्या

रेल्वेच्या धडकेत दोन हरिणांचा मृत्यू, गोंदिया-चंद्रपूर रेल्वे मार्गावरील घटना

वीजेचा झटका देऊन अस्वल आणि बिबट्याच्या जोडप्याची शिकार, वन्यप्रेमी चिंतेत