बदला घेतला! भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केल्या पाकिस्तानी चौक्या, पाहा तुफानी हल्ल्याचा VIDEO

पाकिस्तानी लष्कराचे बंकर्स आणि दहशतवाद्यांचे लॉचिंग पॅडही उडून देण्यात आले आहेत. या तुफानी हल्ल्याचा एक व्हीडिओदेखील समोर आला आहे.

बदला घेतला! भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केल्या पाकिस्तानी चौक्या, पाहा तुफानी हल्ल्याचा VIDEO
| Edited By: | Updated on: Nov 14, 2020 | 11:54 AM

जम्मू काश्मीर : ऐन दिवाळीमध्ये पाकिस्तानच्या (Pakistan) कुरापती सुरूच आहे. यावर आज भारतीय सैन्यानं (Indian Army) पाक सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना (Terrorist) रोखण्यासाठी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या दिशेने तोफ डागून बेछूट गोळीबार केला आहे. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे बंकर्स आणि दहशतवाद्यांचे लॉचिंग पॅडही उडवून देण्यात आले आहेत. या तुफानी हल्ल्याचा एक व्हीडिओदेखील समोर आला आहे. (india action on pakistan in uri sector huge blow in pok)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे तोफखाना आणि इंधन टाक्याही उद्ध्वस्त झाल्या. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याने सर्व स्तरातून त्यांचं कौतूक होत आहे. यावेळी अनेक पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी ठार झाले असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

या हल्ल्याचा एक व्हीडिओ भारतीय सैन्याकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये पाकिस्तानच्या चौक्या असलेल्या डोंगरावर एक मोठा स्फोट होताना दिसत आहे. इतकंच नाही तर यामध्ये एक पाकिस्तानी सैनिक धावत असल्याचंही दिसत आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने हा हल्ला केला आहे.

असं म्हटलं जात आहे की, भारताने पीओकेची लेपा व्हॅली आणि नीलम व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांच्या लॉचिंग पॅडला लक्ष्य केलं होतं. या लॉचिंग पॅडमध्ये घुसखोरी करण्यासाठी मोठ्या संख्येने दहशतवादी बसले असल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली होती.

भारताच्या या कारवाईत पाकिस्तानची दोन बंकर आणि तीन पोस्ट नष्ट झाली आहेत आणि सुमारे 11 सैनिक ठार झाले आहेत. ठार झालेल्या पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांमध्ये 2-3 पाकिस्तानी लष्कराच्या विशेष सेवा गटाच्या अर्थात एसएसजीच्या कमांडोचा समावेश आहे. याशिवाय पाक सैन्याचे 10-12 सैनिकही जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या – 

महाराष्ट्रावर शोककळा, पाकिस्तानच्या गोळीबारात नागपूरच्या सुपुत्राला अवघ्या 28व्या वर्षी वीरमरण

पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राचा वीरपुत्र शहीद, कोल्हापूरचे ऋषीकेश जोंधळे यांना 20व्या वर्षी वीरमरण

(india action on pakistan in uri sector huge blow in pok)