भारतात 24 तासातील सर्वाधिक रुग्णसंख्या, 3900 नवे कोरोनाग्रस्त, 195 कोरोनाबळी

| Updated on: May 05, 2020 | 11:11 AM

देशात गेल्या 24 तासात 3900 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर दुसरीक़डे 195 कोरोनाबळी (India Corona Virus Update) गेले आहेत.

भारतात 24 तासातील सर्वाधिक रुग्णसंख्या, 3900 नवे कोरोनाग्रस्त, 195 कोरोनाबळी
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (India Corona Virus Update) आहे. यामुळे भारतात आतापर्यंत जवळपास 40 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र तरीही गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 3900 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर दुसरीक़डे 195 कोरोनाबळी गेले आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली.

गेले 24 तास भारतासाठी चिंता वाढवणारे ठरले आहेत. आज (5 मे) सकाळी 8 पर्यंत (India Corona Virus Update) देशात 3900 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 46 हजार 433 वर पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे आज झालेली देशातील रुग्णांची वाढ ही आतापर्यंत सर्वाधिक आहे.

भारतातील प्रमुख राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 

राज्य – रुग्ण (कंसात कोरोनाबळी)

  • महाराष्ट्र – 14541 (583)
  • नवी दिल्ली – 4898 (64)
  • गुजरात – 5804 (319)
  • मध्यप्रदेश – 2942 (165)
  • पश्चिम बंगाल – 1259 (133)
  • राजस्थान – 3061 (77)
  • तामिळनाडू – 3550 (31)
  • पंजाब – 1233 (23)
  • आंध्रप्रदेश 1650 (36)
  • तेलंगाणा – 1085 (29)
  • उत्तरप्रदेश – 2766 (50)

भारतात आतापर्यंत 40 दिवसांपेक्षा जास्त दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. मात्र तरीही हा वेग अद्याप कायम आहे. धक्कादायक म्हणजे भारतातील कोरोना विषाणूचा वेग हा अमेरिका, इटली यासारख्या देशांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे भारतासाठी ही बाब चिंताजनक मानली जात आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या विळख्यात आलेल्या 20 देशांसोबत जर तुलना केली तर भारताचा कोरोना रुग्ण वाढीचा वेग जास्त असल्याचे समोर येत आहे. लॉकडाऊन असतानाही इतके रुग्ण वाढत असल्याने हे बाब धक्कादायक मानली जात आहे.

गेल्या 22 मार्चला भारतात सरासरी कोरोना वाढीचा वेग हा  19.9 टक्के इतका होता. मात्र लॉकडाऊननंतर भारतातील कोरोना वाढीचा वेग मंदावला. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटच्या दिवशी म्हणजे 3 मे रोजी हा वेग सरासरी 6.1 टक्क्यावर आला होता. ज्यामुळे भारताला काही प्रमाणात  दिलासा मिळाला. मात्र त्यानंतर आज वाढलेल्या आकड्याने आज पुन्हा एकदा सरासरी टक्केवारीत वाढ झाली (India Corona Virus Update) आहे.

संबंधित बातम्या : 

Corona Updates: महाराष्ट्रात 771 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकूण आकडा 14 हजार 541 वर

जगात काय घडतंय? : टांझानियात बकरी आणि पॉपॉ फळ कोरोना पॉझिटिव्ह