Corona Updates: महाराष्ट्रात 771 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकूण आकडा 14 हजार 541 वर

महाराष्ट्रात आज (4 मे) दिवसभरात एकूण 771 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 541 वर गेली आहे (Total Corona Patient of Maharashtra).

Corona Updates: महाराष्ट्रात 771 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकूण आकडा 14 हजार 541 वर
Follow us
| Updated on: May 04, 2020 | 11:33 PM

मुंबई : महाराष्ट्रात आज (4 मे) दिवसभरात एकूण 771 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 541 वर गेली आहे (Total Corona Patient of Maharashtra). दिवसभरात 350 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत राज्यातील एकूण 2 हजार 465 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. या सर्वांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. या व्यतिरिक्त राज्यात सध्या 1 लाख 98 हजार 42 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच 13 हजार 6 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण 1 लाख 76 हजार 323 नमुन्यांच्या कोरोना चाचणी घेण्यात आल्या. त्यापैकी 1 लाख 62 हजार 349 नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले. 14 हजार 541 जणांना यात कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. आज राज्यात 35 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूंपैकी मुंबईमधील 18, पुण्यातील 7, अकोला मनपातील 5, सोलापूर जिल्ह्यात 1, औरंगाबाद शहरात 1, ठाणे शहरात 1 आणि नांदेड शहरात 1 मृत्यू झाला आहे. मुंबईत उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 22 पुरुष तर 13 महिला आहेत. आज झालेल्या 35 मृत्यूंपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 13 रुग्ण आहेत, तर 19 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 3 जण 40 वर्षांखालील आहेत. यापैकी दोघांच्या इतर आजारांबद्दलची माहिती आलेली नाही. उर्वरित 33 रुग्णांपैकी 23 जणांमध्ये (70 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 583 झाली आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1026 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण 10 हजार 820 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 47.39 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

आज महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री यांनी पुणे संचालक आरोग्य सेवा कार्यालयातील कोरोना वॉर रुमला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्य पातळीवर कोरोना नियंत्रणाचे काम कसे सुरु आहे, याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी कोरोना कॉल सेंटरला भेट देऊन काही नागरिकांशी फोनवरुन स्वतः संवाद साधला. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी कॉल सेंटर अधिक परिणामकारकपणे सुरु ठेवण्याच्या सूचना राजेश टोपे यांनी दिल्या.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी:

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

Mumbai Corona Update : बीडीडी चाळ 8 दिवस पूर्णपणे लॉकडाऊन, बीएमसी आणि पोलिसांचा निर्णय

Maharashtra Corona Live Update : महाराष्ट्रात दिवसभरात 350 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 14,541 वर

ठाण्यात तीन आठवड्यांत एक हजार खाटांचे तात्पुरते कोरोना रुग्णालय उभारणार, एकनाथ शिंदे यांचा निर्णय

राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दाखवा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच, भवानी पेठेत 39 नवे रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

Total Corona Patient of Maharashtra

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.