AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात तीन आठवड्यांत एक हजार खाटांचे तात्पुरते कोरोना रुग्णालय उभारणार, एकनाथ शिंदे यांचा निर्णय

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर या तात्पुरत्या रुग्णालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाण्यात तीन आठवड्यांत एक हजार खाटांचे तात्पुरते कोरोना रुग्णालय उभारणार, एकनाथ शिंदे यांचा निर्णय
| Updated on: May 04, 2020 | 8:20 PM
Share

मुंबई : करोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला काँप्लेक्समध्ये (COVID-19 Hospital In Thane) उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या धर्तीवर ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत 1000 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेला दिले. ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर या तात्पुरत्या रुग्णालयात करण्याचा (COVID-19 Hospital In Thane) निर्णयही घेण्यात आला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या बैठकीत घेतला. यावेळी महापौर नरेश म्हस्के, आयुक्त विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, इत्यादी उपस्थित होते.

 ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर तात्पुरत्या रुग्णालयात

कोरोनावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षमता कमी पडू नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर तात्पुरत्या स्वरुपात 1000 बेडच्या रुग्णालयात करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तीन आठवड्यांच्या आत हे रुग्णालय उभारण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. या ठिकाणी 500 बेड ऑक्सिजनच्या व्यवस्थेसह, 500 बेड विना ऑक्सिजन, तसेच आयसीयू, पॅथॉलॉजिकल लॅब, एक्स-रे, फीवर क्लिनिक आदी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य ज्युपिटर हॉस्पिटल करणार आहे (COVID-19 Hospital In Thane).

केंद्राच्या पथकाने काही दिवसांपूर्वी ठाण्यात भेट देऊन करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी केली होती. या पथकाने रुग्णसंख्या वाढण्याबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाची दखल घेऊन त्यानुसार, उपाययोजनांची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन, असिम्प्टोमॅटिक रुग्ण आणि क्रिटिकल रुग्ण यांची योग्य विभागणी करुन आवश्यक उपचार केले जावेत. रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी कंटेनमेंट एरियामध्ये निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दक्षता बाळगून वेळीच उपाय करण्याची सूचनाही त्यांनी केल्या.

कोरोनाशी लढण्यासाठी मुंबईत 1000 खाटांचं ‘कोविड-19’ रुग्णालय

कोरोनाशी लढण्यासाठी चीनने वुहानमध्ये ज्याप्रकारे 10 दिवसात 1,000 खाटांचं ‘कोविड-19’ रुग्णालय युद्धपातळीवर उभारले होते. तसेच, रुग्णालय मुंबईतही उभारले जात आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात 1,000 खाटांचे ‘कोविड-19’ रुग्णालय उभारत आहे. हे रुग्णालय ऑक्सिजन आणि मॉनिटर यंत्रणांनी सुसज्ज असणार आहे. पुढील 15 दिवसांत हे रुग्णालय युद्धपातळीवर उभारले जाणार आहे.

COVID-19 Hospital In Thane

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या संकटात एपीएमसी अधिकाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती, 20 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवृत्तीसाठी अर्ज

बेळगावात ‘ग्राहक देवो भव:’, दारुच्या दुकानात हार घालून पहिल्या ग्राहकाचं स्वागत

Lockdown : लॉकडाऊन असूनही ‘कोरोना’ का पसरतोय?

पुणे जिल्ह्यात मद्य विक्री आणि उत्पादनाला परवानगी, कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.